AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : कोरड्या त्वचेपासून मुक्त होण्यासाठी ‘हे’ पदार्थ आहारात समाविष्ट करा!

कोरड्या त्वचेची समस्या खूप सामान्य झाली आहे. कोरड्या त्वचेमुळे आपली त्वचा निस्तेज दिसते. याशिवाय खाज आणि लालसरपणाच्या समस्येलाही सामोरे जावे लागते. कोरड्या त्वचेपासून मुक्त होण्यासाठी निरोगी पदार्थांचे सेवन करणे देखील महत्त्वाचे आहे. ते केवळ आपले आरोग्यच नव्हे तर आपली त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Skin Care : कोरड्या त्वचेपासून मुक्त होण्यासाठी 'हे' पदार्थ आहारात समाविष्ट करा!
सुंदर त्वचा
| Edited By: | Updated on: Sep 24, 2021 | 8:10 AM
Share

मुंबई : कोरड्या त्वचेची समस्या खूप सामान्य झाली आहे. कोरड्या त्वचेमुळे आपली त्वचा निस्तेज दिसते. याशिवाय खाज आणि लालसरपणाच्या समस्येलाही सामोरे जावे लागते. कोरड्या त्वचेपासून मुक्त होण्यासाठी निरोगी पदार्थांचे सेवन करणे देखील महत्त्वाचे आहे. ते केवळ आपले आरोग्यच नव्हे तर आपली त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चराइझ करण्यासाठी आपण कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता ते जाणून घेऊया. (Include these foods in your diet to get rid of dry skin)

पाणी

जेव्हा कोरड्या त्वचेवर उपचार करण्याचा प्रश्न येतो तेव्हा पहिला आणि सर्वात महत्वाचा घटक म्हणजे पाणी. पाणी तुमच्या पेशींना पुन्हा हायड्रेट करते. होमिओस्टेसिस राखते. हे त्वचेचे वृद्धत्व रोखते, आणि आपल्या सर्व पेशी सक्रिय आणि कार्यशील ठेवते.

सुकामेवा

आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, सुकामेवा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स तसेच फायटोन्यूट्रिएंट्समध्ये जास्त असतात. सुकामेव्याचा आहारात समावेश केल्याने स्ट्रेसची समस्या दूर होते. आपण दररोज सकाळी मुठभर सुकामेवा खाल्ला पाहीजे.

सोया

सोयामध्ये आयसोफ्लेव्होनचे प्रमाण जास्त आहे. जे कोलेजन सुधारून सुरकुत्या टाळण्यास मदत करू शकते. सोया दूध किंवा सोयाची भाजी खाणे देखील आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे.

टोमॅटो

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि लाइकोपीन असते. जे एक अँटिऑक्सिडेंट आहे. हे त्वचा तरुण ठेवते आणि वृद्धत्व टाळते. आपण नियमितपणे टोमॅटोचे सेवन करू शकता.

मासे

मासे हे ओमेगा -3 फॅट्सचा एक चांगला स्त्रोत आहे. जे आपल्या शरीराद्वारे तयार केले जात नाही परंतु पेशींसाठी ते आवश्यक आहे. तुम्ही तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी आठवड्यातून दोनदा मासे खाऊ शकता किंवा ओमेगा -3 समृद्ध पदार्थ खाऊ शकता.

अंडी

अंडी हे सल्फर आणि ल्यूटिनचे चांगले स्त्रोत आहेत. जे त्वचेची आर्द्रता आणि लवचिकता टिकवून ठेवण्यास मदत करतात. आपण आपल्या नाश्त्यामध्ये अंडी समाविष्ट करू शकता. दररोज सकाळी नाश्त्यामध्ये अंडी घेतल्याने आरोग्याच्या विविध समस्या दूर होतात.

लिंबूवर्गीय पदार्थ

लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन सी साठी आणि मोसंबीचा आहारात समावेश केला पाहिजे. व्हिटॅमिन सीमुळे आपली त्वचा तजेलदार होण्यास मदत मिळते.

गाजर

गाजर बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए च्या सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक आहे. ही दोन्ही जीवनसत्त्वे मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात. ते त्वचेचे वृद्धत्व रोखतात.

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Include these foods in your diet to get rid of dry skin)

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.