AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Care Tips : ‘या’ बियांचा आहारात समावेश करा आणि चमकदार केस मिळवा!

त्वचेप्रमाणेच आपल्या केसांची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. मात्र, सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपल्याला केसांची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही. यामुळे केस गळती, कोंडा, दोन तोंडी इत्यादी समस्या निर्माण होतात. केसांच्या या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये काही खास पदार्थांचा समावेश केला पाहिजे.

Hair Care Tips : 'या' बियांचा आहारात समावेश करा आणि चमकदार केस मिळवा!
सुंदर केस
| Edited By: | Updated on: Nov 06, 2021 | 8:28 AM
Share

मुंबई : त्वचेप्रमाणेच आपल्या केसांची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. मात्र, सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपल्याला केसांची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही. यामुळे केस गळती, कोंडा, दोन तोंडी इत्यादी समस्या निर्माण होतात. केसांच्या या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये काही खास पदार्थांचा समावेश केला पाहिजे. ज्यामुळे आपले केस सुंदर आणि मुलायम होण्यास मदत होईल.

जवस

जवसाच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. ते केस गळणे कमी करते आणि टाळू मजबूत करण्यास मदत करतात. जवस प्रथिने, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि जस्त देखील समृद्ध आहे.

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बिया अनेकांना खाण्यासाठी आवडतात. ज्या केसांच्या वाढीसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. त्या जस्त, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह इत्यादीने समृद्ध आहे. लोह केसांसाठी आरोग्यदायी आहे आणि पातळ होणे आणि तुटणे टाळण्यासाठी योग्य आहे.

तीळ

तीळ काळ्या आणि पांढऱ्या रंगामध्ये असतात. ते अतिशय पौष्टिक आणि जीवनसत्त्वे, खनिजे आणि फॅटी ऍसिडस्ने भरलेले असतात. ते केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात आणि आपल्या केसांना नैसर्गिक चमक देतात.

सूर्यफूलाच्या बिया

सूर्यफूलाच्या बिया आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. त्यात व्हिटॅमिन ईचा एक उत्तम स्त्रोत देखील आहे आणि तुम्ही ते तुमच्या सॅलड्स किंवा स्मूदीजमध्ये मिक्स करू शकता.

चिया बिया

केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले फॅटी ऍसिडस्, प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यामध्ये मुबलक प्रमाणात असतात. त्यात लोह आणि सेलेनियम देखील असतात जे केसांचा पोत, वाढ आणि चमक सुधारतात.

संबंधित बातम्या : 

Health Care : ‘या’ 4 गोष्टी स्मरणशक्तीला मारक, त्यांचा तुमच्या आहारात समावेश नाही ना?, वाचा याबद्दल सविस्तर!

दिवाळीमध्ये जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खात आहात? तर ‘ही’ खास बातमी तुमच्यासाठीच, वाचा सविस्तर!

(Include these seeds in your diet and get beautiful hair)

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप