Skin Care : ‘हे’ घरगुती स्क्रब त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!

त्वचेची काळजी घेण्याच्या नित्यकर्मांमध्ये स्क्रब करणे अत्यंत महत्वाचे आहे. स्क्रबिंगशिवाय आपण आपल्या त्वचेवरील साठेलेल प्रदूषण, धूळ कण आणि मृत त्वचा काढून टाकू शकत नाही.

Skin Care : 'हे' घरगुती स्क्रब त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!
स्क्रब

मुंबई : त्वचेची काळजी घेण्याच्या नित्यकर्मांमध्ये स्क्रब करणे अत्यंत महत्वाचे आहे. स्क्रबिंगशिवाय आपण आपल्या त्वचेवरील साठेलेल प्रदूषण, धूळ कण आणि मृत त्वचा काढून टाकू शकत नाही. यानंतरच आपण आपला चेहरा स्वच्छ करण्यासाठी क्लींजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग केली पाहिजे. त्याच प्रकारे आपण स्क्रबद्वारे आपल्या त्वचेमध्ये नवीन तजेला आणू शकता. (It is beneficial to scrub the skin)

सुंदर आणि चेहऱ्यावरील टॅन काढण्यासाठी आपण घरच्या घरी स्क्रब तयार केला पाहिजे. साखर, टोमॅटो आणि गुलाब पाण्याचा स्क्रब चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हा स्क्रब घरच्या घरी तयार करण्यासाठी तीन चमचे साखर, अर्धे टोमॅटो आणि गुलाब पाणी लागणार आहे. सर्वात प्रथम टोमॅटो आणि गुलाब पाण्याची पेस्ट तयार करा त्यानंतर त्यामध्ये साखर मिक्स करा आणि लगेचच चेहऱ्याला लावा. यावेळी साखर या पेस्टमध्ये विरघळणार नाही, याची काळजी घ्या.

ही पेस्ट साधारण वीस मिनिटे चेहऱ्याला लावा आणि हलक्या हाताने चेहऱ्याचा मसाज करा.
मध आणि ब्राऊन शुगर स्क्रब तयार करण्यासाठी, एक चमचा कच्च्या मधामध्ये, एक चमचा ब्राऊन शुगर घाला. आता त्यात एक चमचा नारळ तेल किंवा ऑलिव्ह तेल घाला. दोन ते तीन थेंब सुगंधी तेल घाला आणि मिक्स करा. आता ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटांसाठी मसाज करा. यानंतर ते 5 मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर पाण्याने स्वच्छ करा.

अक्रोड, आवळा, मध सर्वात अगोदर अक्रोड बारीक करून घ्या. मात्र खूप जास्त बारीक करू नका कारण स्क्रबसाठी ग्रॅन्यूल आवश्यक आहेत. एक चमचा मध घ्या आणि आवळा बारीक करून आता हे सर्व मिक्स करा आणि पेस्ट तयार करा. त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर थोड्या प्रमाणात हे मिश्रण घ्या आणि स्क्रब करा. कमीतकमी 5 मिनिटांसाठी आपला चेहरा स्क्रब करा आणि स्क्रबिंगनंतर 2 मिनिटांसाठी तसाच ठेवा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि कोरडा ठेवा.

जर आपल्या त्वचेवर आणि खडबडीत पॅच असतील तर सतत एक्सफोलीएटिंग केल्याने नको असलेल्या केसांची वाढ थांबण्यास मदत करते. हे सोपा डीआयवाय(DIY) वापरण्यासाठी, थोडासा लिंबाचा रस पिळून घ्या, एक स्क्रब तयार करण्यासाठी मध आणि साखर घाला. ते लावा, गोलाकार गतीमध्ये वरच्या बाजूस मालिश करा. हे 20-30 मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर धुवा.

(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(It is beneficial to scrub the skin)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI