Skin Care : लिंबू, मध आणि हळद फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!

चमकदार, सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी आपण विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. परंतु, आपणास माहित आहे का की, आपण काही घरगुती फेसपॅक वापरून सुध्दा आपली त्वचा सुंदर आणि चमकदार मिळू शकतो. या घरगुती फेसपॅकमुळे आपली त्वचा सुधारण्यास मदत होते.

Skin Care : लिंबू, मध आणि हळद फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!
सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 9:58 AM

मुंबई : चमकदार, सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी आपण विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. परंतु, आपणास माहित आहे का की, आपण काही घरगुती फेसपॅक वापरून सुध्दा आपली त्वचा सुंदर आणि चमकदार मिळू शकतो. या घरगुती फेसपॅकमुळे आपली त्वचा सुधारण्यास मदत होते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी घरगुती उपचार घेतले पाहिजेत.

आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, लिंबू, मध आणि हळद आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे आपल्या त्वचेच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळते. आपण घरचे-घरी लिंबू, मध आणि हळदीचा फेसपॅक तयार करू शकतो. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर होण्यास नक्की मदत मिळते. हा फेसपॅक तयार करण्यासाठी दोन चमचे लिंबाचा रस, अर्धा चमचा हळद आणि मध तीन चमचे लागणार आहे.

वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यासह मानेला लावा. साधारण दहा मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून दोनदा लावू शकता. 1 चमचे संत्र्याच्या सालीचा पावडर घ्या त्यामध्ये 1 चमचा हळद आणि 1 चमचे मध घालाव. ही हे पेस्ट चांगली मिक्स करा यानंतर 5 ते 10 मिनिटे चेहऱ्यावर ही पेस्ट लावून ठेवा. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

केळीचा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी एक केळी, एक चमचा दही, एक चमचा मध, लिंबाचा रस एक चमचा, मुलतानी माती एक चमचा, अर्धा चमचा हळद आणि गुलाब पाणी हे साहित्य लागणार आहे. सर्वात अगोदर केळी बारीक करून घ्या आणि त्यामध्ये मध, हळद, मुलतानी माती, दही, लिंबाचा रस आणि गुलाब पाणी मिक्स करा आणि चांगली पेस्ट तयार करा. यानंतर ही पेस्ट वीस मिनिटे तशीच ठेवा आणि चेहऱ्यासोबत मानेवर लावा. कोमट पाण्याने चेहरा धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Lemon, honey and turmeric facepack are beneficial for the skin)

Non Stop LIVE Update
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.