त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तूपामध्ये ‘हे’ घटक मिक्स करून चेहऱ्याला लावा!

तूप खाणे आपल्या आरोग्यासाठी जसे चांगले आहे. तसेच तूप आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. तूप हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्ससह समृद्ध आहे.

त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तूपामध्ये 'हे' घटक मिक्स करून चेहऱ्याला लावा!
फेसपॅक
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 9:35 AM

मुंबई : तूप खाणे आपल्या आरोग्यासाठी जसे चांगले आहे. तसेच तूप आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. तूप हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्ससह समृद्ध आहे. तूप औषध म्हणूनही वापरले जाऊ शकते. हे आपल्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. तूप वापरल्याने चेहरा चमकदार राहतो. याशिवाय तूप आपल्या केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. (Mix this ingredient in ghee to get rid of many skin problems)

जर आपल्या त्वचेवर सुरकुत्या, काळे डाग, पिंपल्स येत असतील तर आपण दररोज अंघोळीच्या अगोदर तूपामध्ये खोबऱ्याचे तेल मिक्स करून आपल्या त्वचेला लावले पाहिजे. हे तयार करण्यासाठी आपल्याला 5 चमचे तुपात 10 चमचे खोबऱ्याचे तेल मिक्स करा आणि शरीरावर लावा आणि मऊ त्वचा मिळवा. तसेच यामुळे आपल्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास नक्की मदत होईल.

बहुतेक लोक तेलकट आणि कोरड्या त्वचेमुळे त्रस्त असतात. या हंगामात तेलकट त्वचा आधीपेक्षा जास्त तेलकट होते. यामुळे त्वचेचा रंग फिकट पडतो. या हंगामात तेलकट त्वचेपासून मुक्त होण्यासाठी तूप फेसपॅक अत्यंत आवश्यक आहे. तूपामध्ये मॉइस्चरायझिंग गुणधर्म आहेत जे आपल्याला आतून हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात.

विशेषत: जेव्हा शरीर सहजपणे डिहायड्रेट होते. तेंव्हा तूप खाल्ल्याने तुमची त्वचा मऊ आणि चांगली होते. तज्ज्ञ म्हणतात की, तूप ओमेगा-3 फॅट आणि ओमेगा-6 फॅटने समृद्ध आहे आणि आपले वजन कमी करण्यासाठी हे घटक खूप चांगले ठरू शकतात. याव्यतिरिक्त, तूपातील ओमेगा-3 फॅटी अॅसिडस् आपल्या शरीरातील काही ‘इंच’ कमी करण्यात मदत करतात, जे आपल्या शरीराचे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Mix this ingredient in ghee to get rid of many skin problems)

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.