मुलतानी माती, बेसन पीठ आणि मोहरीचे तेल केसांना लावा आणि नैसर्गिक चमक मिळवा!

केसांच्या समस्यांमुळे प्रत्येक जण चिंतेत आहे. चांगल्या केसांसाठी फक्त चांगले उत्पादने वापरून उपयोग नाही, तर केसांची योग्य काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

मुलतानी माती, बेसन पीठ आणि मोहरीचे तेल केसांना लावा आणि नैसर्गिक चमक मिळवा!
केस

मुंबई : केसांच्या समस्यांमुळे प्रत्येक जण चिंतेत आहे. चांगल्या केसांसाठी फक्त चांगले उत्पादने वापरून उपयोग नाही, तर केसांची योग्य काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. अनेक वेळा महागड्या उत्पादनांतूनही केसांना पाहिजे असलेली पोषक तत्त्वे मिळत नाहीत. त्यामुळे केसांच्या समस्या वाढू लागतात. घरच्या घरी काही मिश्रण एकत्र करून तुम्ही आयुर्वेदिक उपाय करून केसांची समस्या दूर करू शकता. (Multani soil and mustard oil are beneficial for hair)

बेसन पीठ, मुलतानी माती आणि मोहरीच्या तेलाच्या मदतीने तुम्ही नैसर्गिकरित्या केसांना चमक देऊ शकतात. यासाठी हे दोन्ही घटक एकत्र मिक्स करून घ्या आणि त्यात मोहरीचं तेल घालून पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट केसांना 10 ते 15 मिनिटं लावून ठेवा आणि मग केस शँपूने चांगले धूवून घ्या. हा उपाय आपण आठ दिवसांमधून एकदा तरी केला पाहिजे. यामुळे नैसर्गिकरित्या आपले केस चमकदार होतील.

रीठा हेअर पॅक बनवण्यासाठी 1 अंडे, 1 चमचा आवळा पावडर, कोरडा रीठा आणि शिकाकाई पावडर एकत्र मिसळून पेस्ट तयार करा. या पेस्टने स्काल्पला मसाज करा आणि अर्धा तास तसेच ठेवा. साधारण अर्धा तासानंतर आपले केस शॅम्पूने धुवा. आठवड्यातून साधारण दोनवेळा ही प्रक्रिया करा. यानंतर आपली केस गळतीची समस्या हळूहळू कमी होत असल्याचे तुम्हाला स्वतः जाणवू लागेल.

नारळ तेल आपल्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आपण केसांचे टॉनिक बनवण्यासाठी कढीपत्त्यासह नारळ तेल मिक्स करू शकता. यासाठी तुम्ही नारळाचे तेल घ्या आणि त्यात कढीपत्ता घाला. आता हे मिश्रण गरम करा. मिश्रण थंड होऊ द्या आणि स्वच्छ कंटेनरमध्ये ठेवा. या मिश्रणाने आपल्या टाळूची संपूर्ण मालिश करा. हे आपल्या केसांवर मुळापासून टोकापर्यंत लावा. काही तास असेच ठेवा. त्यानंतर केस धुवा.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Multani soil and mustard oil are beneficial for hair)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI