AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : कडुलिंबाचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !

शतकांपासून सौंदर्य उत्पादनांमध्ये कडुनिंबाचा वापर केला जात आहे. कडुनिंबाचा फेसपॅक त्वचा उजळण्यास, काळे डाग, लालसरपणा, बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करू शकतो. कडुलिंबामुळे आपली त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. कडुनिंबाचा वापर मुरुमांवर उपचार करण्यासाठी केला जातो.

Skin Care : कडुलिंबाचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !
फेसपॅक
| Edited By: | Updated on: Aug 22, 2021 | 4:21 PM
Share

मुंबई : शतकांपासून सौंदर्य उत्पादनांमध्ये कडुनिंबाचा वापर केला जात आहे. कडुनिंबाचा फेसपॅक त्वचा उजळण्यास, काळे डाग, लालसरपणा, बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करू शकतो. कडुलिंबामुळे आपली त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. कडुनिंबाचा वापर मुरुमांवर उपचार करण्यासाठी केला जातो. कडुनिंबाच्या पानांची पावडर आणि कडुलिंबाचे तेल दोन्ही तुमच्या त्वचेच्या काळजीसाठी वापरले पाहिजे. (Neem face pack is extremely beneficial for the skin)

कडुलिंबाच्या फेसपॅकचे फायदे

त्वचा टोन – कडुलिंबाचा फेसपॅक त्वचेचा टोन सुधारण्यास मदत करतो. कडुलिंबामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स डार्क स्पॉट्स आणि इतर समस्या कमी करण्यास मदत करतात.

मुरुमावर उपचार करते – कडुलिंबाचा फेसपॅक मुरुम कमी करण्यास मदत करतो. हे कोणत्याही प्रकारचे ब्रेकआउट काढून टाकते. खाजलेली त्वचा देखील शांत करते. त्यात असे घटक असतात. जे मुरुमांमुळे होणारे जीवाणू नष्ट करतात. मुरुमाच्या उपचारांसाठी हे अत्यंत फायदेशीर आहे.

ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स – ब्लॅकहेड्स किंवा व्हाईटहेड्सपासून मुक्त होण्यासाठी महागड्या उत्पादनांऐवजी नैसर्गिक पर्याय देखील निवडू शकतात. कडुलिंबाचा फेसपॅक त्वचेवरील सर्व घाण काढून टाकण्यास मदत होते.

त्वचेच्या संसर्गास प्रतिबंध करते – कडुलिंबाचा फेसपॅकमुळे त्वचेचे संक्रमण टाळता येते. कडुलिंबाचे बॅक्टेरियाविरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर आहेत.

वृद्धत्व विरोधी फायदे  कडुलिंबाचा फेसपॅक सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास मदत करते. कडुनिंबामध्ये व्हिटॅमिन ई आणि फॅटी अॅसिड असते. जे त्वचा घट्ट करतात. हे वृद्धत्वाची चिन्हे रोखण्यात मदत करतात.

कडुलिंब आणि कोरफड फेसपॅक – हा फेसपॅक आपली त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार बनवण्यास मदत करेल. यासाठी 1 चमचे कडुनिंबाची पूड आणि ताजे कोरफड जेल घ्या. प्रथम, एका वाडग्यात साहित्य मिसळा आणि पेस्ट तुमच्या त्वचेवर लावा. 15 मिनिटांसाठी ते सोडा नंतर त्वचा मसाज करत आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Neem face pack is extremely beneficial for the skin)

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार