‘या’ सोप्या उपायांनी केस न धुता स्कॅल्पवरील तेलांची समस्या होईल दूर
उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात, स्कॅल्पवर घामासोबतच तेलाचे उत्पादन देखील वाढते, ज्यामुळे धूळ आणि घाण स्कॅल्पवर लवकर चिकटते आणि केस खराब तसेच फ्रिजी दिसू लागतात. अशातच तुमच्याकडे वेळ नसेल, तर तुम्ही शॅम्पू न करता तुमचे केस फ्रेश आणि ऑईल फ्रि करू शकता. चला या सोप्या उपायांबद्दल जाणून घेऊयात.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दमट हवामानात केस खूप लवकर चिकट होतात, ज्यामुळे केस खूप ऑईली तर दिसतातच पण त्याचा परिणाम संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर आणि आत्मविश्वासावरही होतो. खरंतर या ऋतूत घाम येतो, ज्यामुळे धूळ आणि घाण स्कॅल्पला चिकटते. यासोबत अतिरिक्त सेबम स्कॅल्पवर तयार होतो. त्यामुळे केस निर्जीव तसेच कोरडे दिसतात. दर अशातच कामानिमित्त दुसऱ्या दिवशी शॅम्पू करणे शक्य होत नाही आणि जास्त शॅम्पू केल्याने केसांचा नैसर्गिक ओलावा कमी होतो. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, बाजारात विविध केस प्रोडक्ट उपलब्ध आहेत, जी केवळ महागच नाहीत तर केमिकलयुक्त असतात, म्हणून त्यांचा दीर्घकाळ वापर केल्याने केसांचे नुकसान होते. केसांच्या या चिकटपणापासून मुक्त होण्यासाठी, असे उपाय करावे जे स्कॅल्प आणि केसांचा पीएच पातळी खराब करणार नाहीत.
जर पावसाळ्यात तुमचे केस खूप लवकर तेलकट होतात, तर तुमच्या मनात हा प्रश्न अनेकदा आला असेल की दररोज शाम्पू न करता केस ऑईल फ्रि आणि फ्रेश कसे ठेवायचे. या लेखात आपण अशा काही पद्धती जाणून घेणार आहोत ज्या करणे सोपे नाही तर काही मिनिटांत तुम्हाला चिकट केसांपासून मुक्त करतील. चला तर मग जाणून घेऊयात…
गुलाब पाणी सर्वात उत्तम
तुम्हाला जर शाम्पू न लावता चिकट केसांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर गुलाबपाणी यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. यासाठी एका स्प्रे बाटलीत गुलाबपाणी भरा आणि नंतर ते स्कॅल्पपासून केसांच्या टोकापर्यंत स्प्रे करा. त्यानंतर हलक्या हातांनी मसाज करा आणि ते केसांमध्ये चांगले पसरवा. काही वेळानी केस विंचरा. तुमचे केस केवळ फ्रेश दिसणार नाहीत तर त्यांना सौम्य सुगंध देखील तुम्हाल ताजेतवाने वाटेल.
ब्लॉटिंग पेपर उपयोगी पडेल
अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी ब्लॉटिंग पेपर सर्वोत्तम आहे. तुम्ही ते त्वचेसाठी अनेक वेळा वापरले असेल, पण हे पेपर स्कॅल्पवर देखील वापरले जाऊ शकते. जर तुम्हाला शॅम्पूशिवाय स्कॅल्पवरील तेल कमी करायचे असेल तर ब्लॉटिंग पेपर घ्या आणि स्कॅल्पच्या त्वचेवर हलके दाबा. यामुळे अतिरिक्त तेल पेपर शोषून घेईल आणि केस कमी तेलकट दिसतील.
मऊ ब्रश फायदेशीर
जर तुमची स्कॅल्प तेलकट झाली असेल तर प्रथम तुमचे केस गुंडाळा आणि नंतर एक मऊ ब्रश घ्या आणि त्याद्वारे तुमची स्कॅल्प स्वच्छ करा. यामुळे तेल स्वच्छ होईल आणि उर्वरित तेल तुमच्या केसांमध्ये पूर्णपणे पसरेल, ज्यामुळे केस कमी तेलकट दिसतील.
टॅल्कम पावडर चालेल
केसांमधील अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी तुम्ही कॉर्न स्टार्च किंवा टॅल्कम पावडर वापरू शकता. टॅल्कम पावडर थोडेसे स्कॅल्पवर शिंपडा आणि हातांनी पसरवा. काही मिनिटांनंतर कंगव्याने केस विंचरा आणि तेल देखील कमी होईल. अशातच हे लक्षात ठेवा की स्कॅल्पवरील सर्व पावडर स्वच्छ करावी, अन्यथा केस राखाडी आणि फ्रिजी दिसतील.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
