उन्हाळ्यात स्वतःसाठी योग्य स्किन केअर प्रॉडक्ट कसे निवडावे? जाणून घ्या
त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी, त्वचेची काळजी घेणे महत्वाचे आहे. त्याचसोबतच उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. अशावेळेस उन्हाळ्याच्या दिवसात तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार स्किन केअर प्रॉडक्ट निवडावीत. चला तर मग आजच्या या लेखात आपण उन्हाळ्यात स्वतःसाठी योग्य स्किन केअर प्रॉडक्ट कसे निवडावे याबद्दल जाणून घेऊयात...

उन्हाळा सुरू झाला की या दिवसात अनेकांना त्वचेच्या समस्येना सामोरे जावे लागते. त्याच बरोबर उन्हाळ्यात केवळ आरोग्याचीच नव्हे तर त्वचेचीही काळजी घेणे आवश्यक असते. धूळ, सूर्यप्रकाश आणि आर्द्रतेमुळे चेहऱ्यावर कोरडेपणा, पुरळ आणि मुरूम येऊ शकतात. हे सर्व टाळण्यासाठी, लोक सामान्यतः स्किन केअर करणे पसंत करतात. त्वचेची काळजी घेण्यामध्ये अनेक टप्पे असतात, जसे की त्वचा स्वच्छ करणे, टोनर लावणे आणि मॉइश्चरायझ करणे.
पण अनेकदा लोकं स्किनकेअर प्रॉडक्ट खरेदी करताना त्यांच्या त्वचेचा प्रकार लक्षात न ठेवता खरेदी करतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा हे प्रॉडक्ट त्वचेवर लावता तेव्हा ते त्यांचा प्रभाव दाखवू शकत नाहीत. म्हणून, तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार स्किन केअर प्रॉडक्ट खरेदी करणे महत्वाचे आहे. तर मग या लेखात आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य स्किन केअर प्रॉडक्ट कसे निवडायचे ते सांगणार आहोत…
कोरडी त्वचा
उन्हाळ्यात, कोरडी त्वचा असलेल्या लोकांनी हलकी, मॉइश्चरायझिंग आणि हायड्रेटिंग प्रॉडक्ट निवडावीत. जसे की शिया बटर, कोरफड आणि ग्लिसरीन सारखे घटक असलेले प्रॉडक्ट निवडणे महत्वाचे आहे. कोरडी त्वचा असलेल्या लोकांनी वॉटर टेक्सचर असलेले मॉइश्चरायझर्स निवडावेत. हे तुमच्यात्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवतात, त्यामुळे त्वचा कोरडी वाटत नाही. सनस्क्रीनसाठी, क्रीम बेस्ड आणि 50 पेक्षा जास्त एसपीएफ असलेले निवडा. कोरडी त्वचा असलेल्या लोकांनी असे क्लीन्सर निवडावे जे त्वचेच्या ओलाव्याला नुकसान पोहोचवू नयेत. यासाठी, ग्लिसरीन असलेले क्लीन्सर हा एक चांगला पर्याय आहे.
संवेदनशील त्वचा
उन्हाळ्यात, संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी हलके, फ्रेगरेंस नसलेले आणि कमी प्रिजर्वेटिव असलेले प्रॉडक्ट निवडावीत. शक्य असल्यास, कोरफड, कॅमोमाइल आणि ग्रीन टी सारखे नैसर्गिक घटक असलेले प्रॉडक्ट निवडा. क्रीम बेस्ड क्लीन्सर वापरा. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही मिनरल बेस्ड सनस्क्रीन निवडावे. नैसर्गिक टोनर वापरा, ज्यासाठी तुम्ही गुलाब पाणी वापरू शकता.
सामान्य त्वचा
जर तुमची त्वचा सामान्य असेल तर तुम्ही तेलमुक्त आणि वॉटर टेक्सचर आधारित प्रॉडक्ट निवडावीत. तुम्ही स्पेक्ट्रम सनस्किन हा ब्रँड निवडावा. जे UVA आणि UVB दोन्ही किरणांपासून संरक्षण करू शकते. हलके वॉटर बेस्ड आणि तेल-मुक्त मॉइश्चरायझर्स आणि क्लीन्सर वापरा. ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचा चिकट होत नाही.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
