SPF सनस्क्रीनचे एकुण किती प्रकार? तुमच्यासाठी कोणते योग्य?
सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी एसपीएफ सनस्क्रीन लावणे खूप महत्वाचे आहे. पण आजकाल बाजारात अनेक प्रकारचे एसपीएफ क्रीम उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यात काय फरक आहे आणि तुमच्यासाठी कोणता योग्य आहे? चला तज्ञांकडून त्याबद्दल जाणून घेऊया.

वातावरणात उन्हाचा तडाखा वाढल्याने प्रत्येकजण त्वचेची काळजी घेण्यास सुरूवात केली आहे. कारण या दिवसांमध्ये त्वचा निरोगी ठेवण्यासाठी योग्य काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. त्यात त्वचेच्या काळजीसाठी अनेक प्रकारच्या बाजारात मिळणारे क्रिम आपण वापरत असतो. पण सध्या कडक उन्हापासून त्वचा निरोगी राहावी यासाठी सनस्क्रीन यापैकी एक उत्तम क्रिम आहे. प्रदूषण आणि बदलत्या हवामानाव्यतिरिक्त सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे देखील त्वचेचे नुकसान होऊ शकते. यामुळे सुरकुत्या, वृद्धत्वाची चिन्हे आणि उन्हामुळे होणारी जळजळ यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत एसपीएफ सनस्क्रीन वापरणे खूप महत्वाचे आहे.
एसपीएफ सनस्क्रीन सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट (यूव्ही) किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते. सूर्यप्रकाशामुळे दोन प्रकारच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे त्वचेच्या काळजीसाठी एसपीएफ सनस्क्रीन लावल्यास सुर्याच्या किरणांपासून संरक्षण होते. जेव्हा UVB किरणांच्या संपर्कात आल्याने त्वचेला सूज येते आणि जळजळ होते तेव्हा सनबर्न होतो. एसपीएफ सनस्क्रीन या हानिकारक किरणांपासून संरक्षण करण्यास आणि सनबर्न टाळण्यास मदत करते.
पण आजही खूप कमी लोकं एसपीएफ सनस्क्रीन वापरतात. त्यात असे काहीजण आहेत जे अशी क्रिम वापरतात जे त्यांच्या त्वचेनुसार कोणते सनस्क्रीन वापरावे हे माहित नसते. अशा परिस्थितीत, SPF सनस्क्रीनचे किती प्रकार आहेत आणि कोणते तुमच्यासाठी योग्य आहे हे तज्ञांकडून जाणून घ्या.
एसपीएफ क्रीमचे किती प्रकार आहेत?
दिल्लीतील श्री बालाजी अॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटमधील वरिष्ठ सल्लागार, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. विजय सिंघल म्हणतात की एसपीएफ (सन प्रोटेक्शन फॅक्टर) ही क्रीम आहे जी तुमच्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवते. SPF क्रीमचे अनेक प्रकार आहेत, जे तुम्ही तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर लावू शकता, त्यापैकी काही मुख्य म्हणजे SPF 15, ही SPF क्रीमचा स्थर सर्वात कमी आहे, जी त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून 93% पर्यंत संरक्षण देते. हे एसपीएफ क्रीम अशा लोकांसाठी योग्य आहे जे कमी वेळेसाठी सूर्यप्रकाशात राहतात.
SPF 30 ही मध्यम पातळीची एसपीएफ क्रीम आहे, जी त्वचेला 97 % पर्यंत हानिकारक सूर्यकिरणांपासून संरक्षण देते. हे एसपीएफ क्रीम त्यांच्यासाठी योग्य आहे जे मर्यादित काळासाठी सूर्याच्या संपर्कात येतात, म्हणजेच खूप जास्त किंवा खूप कमीही नाहीत. SPF 50: ही एसपीएफ क्रीमची सर्वोच्च पातळी आहे जी त्वचेला ९९% हानिकारक सूर्य किरणांपासून संरक्षण देते. हे एसपीएफ क्रीम अशा लोकांसाठी योग्य आहे जे जास्त वेळ सूर्यप्रकाशात काम करतात किंवा ज्यांची त्वचा खूप संवेदनशील असते.
तुमच्यासाठी कोणता एसपीएफ योग्य आहे?
अशा परिस्थितीत, तुमच्यासाठी कोणते एसपीएफ क्रीम योग्य आहे हे तुमच्या त्वचेच्या प्रकारावर, सूर्यकिरणांच्या संपर्कात येण्याच्या वेळेवर आणि तुमच्या वैयक्तिक पसंतींवर अवलंबून असते. म्हणून, तुमच्या त्वचेसाठी योग्य एसपीएफ क्रीम निवडण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा किंवा त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)