AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care Tips | निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी 4 आयुर्वेदिक औषधी वनस्पती वापरा, हिवाळ्यातही तजेलदार त्वचा मिळवा!

भारताला आयुर्वेदाची मोठी परंपरा आहे. आपल्या आयुर्वेदातील ग्रंथांमध्ये सौंदर्य आबादीत ठेवण्यासाठी अनेक उपाय संगितले आहेत. शतकानुशतके आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी औषधी वनस्पती अत्यंत फायदेशीर आहेत. औषधी वनस्पतींमध्ये शक्तिशाली उपचार गुणधर्म देखील आहेत.

Skin Care Tips | निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी 4 आयुर्वेदिक औषधी वनस्पती वापरा, हिवाळ्यातही तजेलदार त्वचा मिळवा!
Face
| Edited By: | Updated on: Nov 03, 2021 | 2:13 PM
Share

मुंबई : भारताला आयुर्वेदाची मोठी परंपरा आहे. आपल्या आयुर्वेदातील ग्रंथांमध्ये सौंदर्य आबादीत ठेवण्यासाठी अनेक उपाय संगितले आहेत. शतकानुशतके आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी औषधी वनस्पती अत्यंत फायदेशीर आहेत. औषधी वनस्पतींमध्ये शक्तिशाली उपचार गुणधर्म देखील आहेत. त्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, एंजाइम आणि इतर पोषक घटक देखील असतात. त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी हे महत्त्वाचे आहेत. या हिवाळ्यात तुम्ही निरोगी त्वचेसाठी काही उपाय करून पाहू शकता.

चमकदार त्वचेसाठी 4 आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर करा

तुळस

बहुतेक घरांमध्ये अनेक प्रकारच्या रोगांसाठी याचा वापर केला जातो. सर्दी आणि खोकल्यांवर उपचार करण्यात मदत होते जे हिवाळ्यात सामान्य असतात. याशिवाय त्वचा आणि टाळूसाठी हे खूप फायदेशीर आहे. तुळशीची पाने पाण्यात उकळा आणि पाने थंड झाल्यावर पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या त्वचेवर लावा. यामुळे शरिराची होणारी जळजळ कमी होण्यास आणि त्वचा चमकदार होण्यास मदत होईल.

हळद

प्राचीन काळापासून हे आपल्या पारंपारिक औषधी आणि सौंदर्याचा एक भाग आहे. त्यातील दाहक-विरोधी गुणधर्म आणि जंतुनाशक गुणधर्म त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होण्यास मदत होते. नियमितपणे वापरल्यास, ते टॅन काढून टाकण्यास आणि त्वचेचा रंग हलका करण्यास देखील मदत करू शकते. थोड्या दह्यात चिमूटभर हळद मिसळा, त्वचेवर लावा आणि 20 मिनिटांनंतर धुवा.

आवळा

आवळा हे आयुर्वेदिक उपचारांमध्ये सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. हिवाळ्यात आवळा आगदी मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. आवळा त्वचा आणि केसांसाठी हे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे रोज एका कच्च्या आवळाचा रस एक ग्लास पाण्यात मिसळून प्या. आवळा हेअर ऑइल बनवण्यासाठी, फक्त मूठभर कोरडा आवळा घ्या, तो बारीक वाटून घ्या आणि 100 मिली शुद्ध खोबरेल तेलात मिसळा. हे तेल हवाबंद काचेच्या बाटलीत भरून सुमारे 15 दिवस उन्हात ठेवा. नंतर तेल गाळून साठवा. तुम्हाला पाहिजे तेव्हा केसांना लावा.

कोरफड

कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फोलिक अॅसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांच पुरवठा होतो. त्यामुळे तुम्ही दररोजच्या आहारात कोरफडीच्या रसाचा समावेश केला पाहिजे.कोरफड हा हिवाळ्यात त्वचा आणि केस या दोन्हींसाठी उपयुक्त घटकांपैकी एक आहे. कारण ते उत्तम मॉइश्चरायझर म्हणून काम करते. त्वचा आणि केसांचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. त्यात जस्त देखील असते ज्याचा जखमा, भाजणे आणि क्रॅकवर उपचार करणारा प्रभाव असतो. कोरफड त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. दररोज चेहऱ्यावर जेल लावा आणि 15 मिनिटांनी धुवा.

इतर बातम्या :

फटाके फोडताना, फराळ बनवताना भाजतं, चटका बसलाय का? हे घरगुती उपाय नक्की करुन पाहा

Festival Look | दिवाळीत हटके लूक हवाय? मग तुमच्या केसांच्या लांबीप्रमाणे निवडा हेअरस्टाईल

Tourist Destinations | दिवाळीमध्ये फिरायला जाताय?, अयोध्येपासून कुर्गपर्यंत 5 ठिकाणांना नक्की भेट द्या

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.