AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुतोंडी केसांपासून सुटका मिळवायची तर अवलंबा ‘हे’ मार्ग

केसांच्या दुतोंडी समस्येने बहुतेक स्त्रिया त्रस्त असतात. हे टाळण्यासाठी अनेक प्रकारची उत्पादनेही वापरली जातात. पण उत्पादनांनी थोडे दिवस केस चांगले रहातात पुन्हा तीच समस्या भेडसावते. तर तुम्ही बाजारातील कोणतेही महागडे उत्पादन किंवा प्रॉडक्ट वापरण्याऐवजी या काही टिप्सने केस निरोगी करा.

दुतोंडी केसांपासून सुटका मिळवायची तर अवलंबा 'हे' मार्ग
hairs Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 02, 2025 | 12:59 PM
Share

लांब आणि सुंदर केस असणे ही प्रत्येक महिलेची इच्छा असते, पण केसांमध्ये जर दुतोंडी केसांची समस्या (स्प्लिट टोक) असतील तर त्यामुळे केसांचे सौंदर्य कमी होतं. जेव्हा तुमच्या केसांचा ओलावा आणि पोषण कमी होते तेव्हा दुतोंडी केसाची समस्या उद्भवतात. याशिवाय वारंवार उष्णतेची स्टायलिंग, रासायनिक उत्पादनांचा अतिवापर किंवा योग्य काळजी न घेणे यामुळेही केस दुतोंडी होतात. अश्याने केस अतिशय निर्जीव आणि कोरडे दिसतात. त्याबरोबर केस गळण्यासारख्या समस्या उद्भवतात.

तुम्हाला सुद्धा दुतोंडी केसांच्या समस्येपासून सुटका मिळवायची असल्यास तुम्ही योग्य सवयी आणि घरगुती उपायांचा अवलंब करून तुमचे केस पुन्हा निरोगी बनवू शकता. आज या लेखात आम्ही तुम्हाला असे सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहोत जे तुमच्या केसांना दुतोंडी होण्यापासून वाचवतील आणि त्यांना निरोगी बनवतील.

1. दर 2 महिन्यांनी ट्रिमिंग करा

बराच वेळ केस न कापल्याने केसांमध्ये दुतोंडी केसांची समस्या देखील उद्भवू शकते. त्यामुळे शक्य असल्यास दर ६-८ आठवड्यांनी केस कापत राहावे. ट्रिमिंगमुळे केसांची दोन तोंडं निघून जातात आणि केसांची वाढ सुधारते. केस कापल्या नंतर केसांची दोन तोंडे तर कमी होतातच शिवाय केस गळण्यासारख्या समस्येपासूनही काहीसा आराम मिळतो.

2. हेअर मास्कचा वापर करा

दुतोंडी केसांची समस्या असल्यास केसांना पोषणाची गरज असते. पोषणाशिवाय केसांचे आरोग्य अतिशय बिघडते आणि मग केसांमध्ये अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. त्यामुळे केसांना वेळोवेळी हेअर मास्क लावावा. तुम्ही घरच्या घरी देखील हेअर मास्क बनवू शकता. हेअर मास्कसाठी अंड्यातील पिवळ बलकात २ चमचे मध आणि २ चमचे खोबरेल तेल मिसळून केसांना ३० मिनिटे लावून ठेवावे. अर्ध्या तासानंतर केस धुवून घ्या. हा मास्क केसांना पोषण तर देतोच पण केस मऊ आणि चमकदार बनवतो.

3. गरम तेलाने केसांना मसाज करून घ्या

दुतोंडी केस टाळण्यासाठी गरम तेलाने केसांना मसाज करणे देखील एक चांगला पर्याय आहे. यासाठी नारळ, ऑलिव्ह किंवा बदामाचे तेल हलके गरम कोमट करून टाळू आणि केसांवर हळुवारपणे मसाज करा. केस असेच १ तास ठेवा आणि नंतर शॅम्पू करा. या पद्धतीमुळे केसांचे सखोल पोषण होईल आणि केसांना दोन टोके दुतोंडी केस होण्यापासून रोखले जाईल.

4. केस धुण्याचे योग्य मार्गाचे अवलंबा

अनेकदा काही लोकं अतिशय चुकीच्या पद्धतीने केस धुतात, ज्यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात. तसेच केस कोरडे होतात. त्यामुळे केस निरोगी ठेवण्यासाठी ते व्यवस्थित धुणे गरजेचे आहे. शक्य असल्यास तुम्ही नेहमी सौम्य शॅम्पू वापरा. जास्त गरम पाण्याने केस धुवू नका. शॅम्पूनंतर नेहमी कंडिशनरचा वापर करा. असे केल्याने तुम्ही केसांच्या दोन तोंडांची समस्या टाळू शकता.

5. केसांना हिटपासून वाचवा

तुम्ही जर नेहमी केसांना स्ट्रेटनरवापरत असला तर याने तुम्हाला दुतोंडी केसांची समस्या निर्माण होऊ शकते. कारण केसांना हिटचा सतत वापर खूप हानिकारक आहे. स्टायलिंगसाठी अनेक जण ब्लो ड्रायर, स्ट्रेटनर किंवा कर्लरचा वापर करतात, ज्यामुळे केसांमध्ये दोन तोंडांची समस्या उद्भवते. त्यामुळे शक्य तो केसांमध्ये उष्णतेची साधने वापरू नका. तुम्ही कधीही याचा वापर करू इच्छित असल्यास, प्रथम उष्णता संरक्षण सीरम लावा.

6. योग्य आहार घ्या

योग्य आहारा न घेणे यामुळेही केसांच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आहारात सुधारणा करणंही गरजेचं आहे. अशावेळी तुम्ही तुमच्या आहारात प्रथिनेयुक्त पदार्थ जसे की अंडी, डाळी आणि मांस आणि मासे खावे. यासोबतच आहारात ओमेगा-3 फॅटी ॲसिडसाठी नटस आणि बियाण्यांचा समावेश करा. त्याचबरोबर व्हिटॅमिन ईसाठी हिरव्या पालेभाज्या घाला. या प्रकारच्या डाएटमुळे केस आतून मजबूत होतात. व केसांना योग्य पोषण मिळाल्याने केसांची योग्य वाढ होत राहते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.