Tea Tree Oil : केसांसाठी टी ट्री ऑईल ‘या’ प्रकारे वापरा आणि सुंदर केस मिळवा!

टी ट्री ऑईल आपल्या केसांसाठी आणि टाळूसाठी खूप फायदेशीर आहे. मुळात ही वनस्पती ऑस्ट्रेलियामध्ये आढळते.

Tea Tree Oil : केसांसाठी टी ट्री ऑईल 'या' प्रकारे वापरा आणि सुंदर केस मिळवा!
सुंदर केस

मुंबई : टी ट्री ऑईल आपल्या केसांसाठी आणि टाळूसाठी खूप फायदेशीर आहे. मुळात ही वनस्पती ऑस्ट्रेलियामध्ये आढळते. हे तेल एका वैज्ञानिक प्रक्रियेच्या मदतीने Melaleuca alternifolia नावाच्या वनस्पतीच्या पानांमधून काढले जाते. तेलाचे अँटी सेप्टिक, अँटी फंगल आणि अँटी मायक्रोबियल फायदे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. (Tea tree oil is beneficial for hair)

हे केसांशी संबंधित समस्या जसे डोक्यातील कोंडा, खाज सुटणे, टाळूचे संक्रमण किंवा केस गळणे इत्यादी दूर करण्यास मदत करते. शॅम्पूमध्ये टी ट्री ऑइल मिक्स करून केसांना लावणे फायदेशीर आहे. यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. टी ट्री ऑइल 5-6 थेंब शॅम्पूमध्ये मिसळा आणि दोन मिनिटांसाठी केस आणि टाळूवर हलक्या हाताने मसाज करा. 5-8 मिनिटे सोडा. साध्या पाण्याने स्वच्छ धुवा आणि आठवड्यातून 2-3 वेळा ही प्रक्रिया पुन्हा करा.

एक पिकलेला एवोकॅडो अर्धा कापून घ्या. बिया आणि साल काढून टाका. त्यानंतर एवोकॅडो मॅश करा आणि चांगली पेस्ट तयार करा. त्यात 1-2 चमचे व्हिटॅमिन ई तेल आणि टी ट्री ऑइल काही थेंब घाला. सर्वकाही एकत्र करा आणि हे हेअर मास्क संपूर्ण टाळू आणि केसांवर लावा. सौम्य शैम्पूने धुण्यापूर्वी 30-40 मिनिटे सोडा.

निरोगी केसांसाठी तुम्ही हे हेअर मास्क आठवड्यातून एकदा किंवा दोनदा टी ट्री ऑईल, एवोकॅडो आणि व्हिटॅमिन ई तेलाने पुन्हा करू शकता. एका पॅनमध्ये 2 कप नारळ तेल गरम करा आणि 1/4 कप भाजलेले कॉफी बीन्स घाला. झाकण ठेवून थोडावेळ मंद आचेवर शिजवा. ते जळणार नाही याची काळजी घ्या. गॅसवरून काढा आणि कॉफी बीन्स वेगळे करण्यासाठी तेल चाळून घ्या. काचेच्या बाटलीत भरून ठेवा.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Tea tree oil is beneficial for hair)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI