AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्किन केअर संबंधित ‘या’ 10 गैरसमजावर लोकं ठेवतात सहज विश्वास, जाणून घ्या

प्रत्येक ऋतूमध्ये त्वचेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. पण बऱ्याचदा आपण त्वचेच्या काळजीशी संबंधित अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो ज्या खऱ्या नसतात आणि त्यावर विश्वास ठेवल्याने आपण त्यानूसार उपाय आपल्या त्वचेवर करत असतो आणि आपली त्वचा खराब होते. तर या लेखात आपण जाणून घेऊया की असे कोणते गैरसमज आहेत ज्यावर तुम्ही चुकूनही विश्वास ठेवू नये.

स्किन केअर संबंधित 'या' 10 गैरसमजावर लोकं ठेवतात सहज विश्वास, जाणून घ्या
skin careImage Credit source: Pexels
| Edited By: | Updated on: Jun 01, 2025 | 11:56 PM
Share

बदलत्या वातावरणानुसार तसेच ऋतू नुसार आपण आपल्या त्वचेची काळजी घेण्यासोबतच निरोगी राहण्यासाठी योग्य जीवनशैली आणि आहार घेणे खूप महत्वाचे आहे. त्यातच अनेकजण असेही आहेत जे चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी अनेक प्रकारची प्रोडक्ट वापरतात पण कधीकधी बाजारातून आणलेले हे कॅमिकलयुक्त प्रोडक्ट त्वचेवर चांगला फरक जाणवत नाही. कारण आपण वापरत असलेले प्रोडक्ट आपल्या त्वचेच्या प्रकारासाठी योग्य नसण्याची शक्यता आहे. आजकाल, सोशल मीडियावर बरेच लोकं सौंदर्याशी संबंधित विविध प्रकारच्या कंटेंटबद्दल सांगत असतात आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेऊन स्किन केअर करत असतो. त्यांनतर त्वचेचे नुकसान होते.

स्किन केअर संबंधित अनेक गोष्टी आपण ऐकल्या आहेत जसे की तेलकट त्वचेवर मॉइश्चरायझर लावू नये, उन्हाळ्यात फक्त अँटीबॅक्टेरियल साबण किंवा फेस वॉश वापरावा. पण या गोष्टींमध्ये खरोखर काही तथ्य आहे का? त्वचेशी संबंधित अनेक गैरसमज आहेत ज्यांना आपण खरे मानतो. चला तर आजच्या या लेखात आपण अशाच स्किन केअर संबंधित असलेले गैरसमज नेमकी कोणते आहेत ते जाणून घेऊयात.

तेलकट त्वचेवर मॉइश्चरायझर लावू नका

तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी मॉइश्चरायझर वापरू नये असा गैरसमज अनेकांमध्ये आहे पण हे अजिबात खरे नाही. बाजारात प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी क्रीम्स व मॉइश्चरायझर उपलब्ध असते. त्यामुळे तेलकट त्वचा असलेल्यांनी जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरावे.

घरी सनस्क्रीन लावू नका

तुम्ही जर दिवसभर घरी राहिलात तर सनस्क्रीन लावू नये ही देखील एक गैरसमज आहे. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावणे फार महत्वाचे आहे. पण तुम्ही घरी असल्याने मोबाईल आणि लॅपटॉप वापरता, तेव्हा तुम्ही घरीही सनस्क्रीन लावू शकता. कारण त्यातून निघणारे किरण त्वचेलाही नुकसान पोहोचवतात.

अँटीबॅक्टेरियल साबण वापरा

अँटीबॅक्टेरियल साबण दररोज वापरणे योग्य नाही कारण त्यामुळे अँटीबायोटिक-रेजिडेंट बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते. जेव्हा तुम्हाला त्वचेची ॲलर्जी किंवा संसर्ग असेल तेव्हाच या प्रकारचा साबण वापरावा.

मुरुम येण्याची समस्या फक्त किशोरवयीन मुला-मुलींना होते

आपण नेहमीच ऐकले आहे की पुरळ आणि मुरुमांची समस्या फक्त किशोरवयीन मुलांमध्येच उद्भवते कारण यावेळी हार्मोन्स बदलतात. पण ही एक गैरसमज आहे, मुरुमांची समस्या वयापेक्षा खराब जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे जास्त उद्भवते.

दररोज चेहरा स्क्रब करणे

ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी दररोज चेहरा स्क्रब करावा असे आपण अनेकदा ऐकले आहे. त्वचेवरील घाण आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी स्क्रबचा वापर केला जातो. जर तुम्ही दररोज स्क्रब केले तर ते तुमच्या त्वचेला नुकसान होऊ शकते. जळजळ, लालसरपणा आणि खाज सुटणे यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.

10 स्टेप्स स्किन केअर रूटीन योग्य आहे

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही जितके जास्त स्टेप्स फॉलो करणार तितकाच तुमचा चेहरा चमकेल असे अनेकांना वाटते. पण ही एक गैरसमजआहे. तुमची त्वचेची काळजी घेण्याची दिनचर्या जितकी लहान आणि सोपी असेल तितकेच ते फॉलो करणे तूम्हाला सोपे होईल.

मेकअप करणाऱ्यांसाठीच डबल क्लींजिंग आवश्यक आहे

काही लोकांचा असा विश्वास आहे की जे मेकअप करतात त्यांनीच त्यांच्या चेहऱ्याची डबल क्लींजिंग करावी. पण असं नाहीये, ही पद्धत जास्तीचे तेल आणि चेहऱ्यावरील घाण काढून टाकण्यास मदत करते. म्हणून, ही पद्धत तेलकट त्वचा असलेल्या लोकांसाठी देखील सर्वोत्तम आहे.

हर्बल प्रोडक्ट त्वचेसाठी चांगली असतात

तुम्ही वापरत असलेली कोणतीही हर्बल प्रोडक्ट तुमच्या त्वचेसाठी चांगली असतीलच असे नाही. कारण कधीकधी नॅचरल प्रोडक्ट देखील काही लोकांच्या त्वचेला सुट होत नाहीत. त्यामुळे कोणतीही नवीन वस्तू वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा आणि जर काही जळजळ झाली तर ती वापरू नका.

मेकअप वापरल्याने तुमच्या त्वचेचे नुकसान होते

जर तुम्ही चांगल्या ब्रँडचे आणि तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार मेकअप प्रोडक्ट वापरत असाल तर तुमच्या त्वचेला नुकसान होण्याची शक्यता कमी असते. कारण बहुतेक त्वचेच्या समस्या चुकीच्या जीवनशैली आणि अस्वस्थ खाण्याच्या सवयींमुळे होतात.

पाण्यामुळे चेहऱ्याला ग्लो येतो.

आपण नेहमीच ऐकले आहे की जास्त पाणी प्यायल्याने त्वचा चमकदार होते आणि मुरुम येण्यापासून बचाव होतो. पण हे पूर्णपणे खरे नाही कारण पूरळ आणि मुरुमांची समस्या प्रदूषण आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे होते. तुमच्या त्वचेतील सेबेशियस ग्रंथी तेल म्हणून आणि बाहेरून मॉइश्चरायझर म्हणून काम करतात, ज्यामुळे तुमची त्वचा किती कोरडी किंवा तेलकट असू शकते हे ठरवता येते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.