
बदलत्या ऋतूत प्रत्येकजण आपापल्या त्वचेची काळजी घेत असतो. बहुतेक लोक चेहऱ्याच्या काळजीकडे अधिक लक्ष देतात, परंतू यामध्ये हात आणि पायांच्या त्वचेकडे दुर्लक्ष होते. कारण चेहऱ्याव्यतिरिक्त आपले हात आणि पाय चांगले दिसणे देखील महत्त्वाचे आहे, कारण ते व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. सूर्यप्रकाश, धूळ आणि प्रदूषण चेहऱ्यावर तसेच हात व पाया यांच्या त्वचेवर देखील परिणाम करतात. यामुळे त्वचेत कोरडेपणा येतो आणि त्वचा निर्जीव दिसू लागते. त्वचेला नियमित मॉइश्चरायझिंग करून तुम्ही हात आणि पायांची त्वचा निरोगी ठेवू शकता, परंतु बहुतेक लोकांना हे एक त्रासदायक काम वाटते, अशातच बहुतेकजण बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्टचा वापर करतात. पण या प्रोडक्टच्या वापराने त्वचेवर फारसा परिणाम होत नाही. पण आजकाल अनेकजण आता घरगुती उपाय करतात. तर आजच्या लेखात आपण असे एक उटण बनवण्याची पद्धत शिकू जे तुम्ही महिने वापरू शकता. या उटण्यामुळे त्वचेचा रंग देखील सुधारेल.
उटण्याचा वापर भारतीय घरांमध्ये खूप काळापासून केला जात आहे. तुम्ही आंघोळीपूर्वी ते नियमितपणे तुमच्या त्वचेवर लावू शकता. उटणे हे त्वचेला खोलवर स्वच्छ करते आणि निरोगी देखील ठेवते. तसेच हे घरगुती उटणे स्क्रबपासून मॉइश्चरायझरपर्यंत काम करते.
उटणे बनवण्यासाठी तुम्हाला मसूरची डाळ, मुलतानी माती, बेसन, हळद, चंदन पावडर, सुकलेल्या संत्र्याच्या साली. या सर्व गोष्टी त्वचेचा रंग सुधारण्यापासून ते मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यापर्यंत तसेच चमक वाढवण्यापर्यंत आणि त्वचेच्या अनेक समस्यांपासून दूर ठेवण्याचे काम करतात. चला ते बनवण्याची पद्धत जाणून घेऊया.
मसूर मिक्सरमध्ये बारीक करा, त्यासोबत मुलतानी माती बारीक करा आणि पावडर बनवा किंवा बाजारातून आणलेली मुलतानी माती मिक्स करा. त्यानंतर संत्र्याची सालं बारीक करा आणि पावडर बनवा. त्यानंतर एका भांड्यात मसूर, मुलतानी माती, चंदन पावडर, संत्र्याची पावडर यासह सर्व गोष्टी समान प्रमाणात मिक्स करा,परंतु या मिश्रणात फक्त एक चमचा हळद मिक्स करा. शक्यतो घरीच हळद तयार करा, कारण बाजारातील हळदीच्या पावडरमध्ये रंग मिसळलेला असतो, जो हानिकारक असू शकतो. आता तयार उटण पावडर हवाबंद डब्यात ठेवा.
जेव्हा जेव्हा तुम्हाला उटण लावायचे असेल तेव्हा ते तुमच्या गरजेनुसार एका भांड्यात उटण पावडर काढा आणि त्यात गुलाबपाणी, दूध आणि थोडेसे नारळ तेल किंवा बदाम तेल घालून पेस्ट तयार करा. तुम्ही ते चेहऱ्यासह संपूर्ण शरीरावर लावू शकता. अर्ध्या तासानंतर, गोलाकार हालचालीत मालिश करून उटण काढा आणि आंघोळ करा. ही उटण पावडर व्यवस्थित पद्धतीने ठेवल्यास अनेक महिने खराब होत नाही.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)