Skin Care : ‘या’ हंगामात त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी ‘हे’ फेसपॅक नक्की वापरा !

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 27, 2021 | 7:46 AM

सध्याच्या पावसाळ्याच्या हंगामात महिलांबरोबर पुरूषांनी देखील आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्याची आवश्यक्ता आहे. आता सनस्क्रीनचा नियमित वापर करा. निरोगी त्वचेकरिता सनस्क्रीनचा वापर करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. कधीही सनस्क्रीनशिवाय बाहेर पडण्याची चूक करू नका.

Skin Care : 'या' हंगामात त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी 'हे' फेसपॅक नक्की वापरा !
त्वचा

मुंबई : सध्याच्या पावसाळ्याच्या हंगामात महिलांबरोबर पुरूषांनी देखील आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्याची आवश्यक्ता आहे. आता सनस्क्रीनचा नियमित वापर करा. निरोगी त्वचेकरिता सनस्क्रीनचा वापर करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. कधीही सनस्क्रीनशिवाय बाहेर पडण्याची चूक करू नका. सनस्क्रीनचा वापर हा अकाली वृद्धत्वापासून नक्कीच संरक्षण करेल. (This face pack is beneficial for keeping the skin radiant this season)

या हंगामात त्वचा सुंदर आणि तजेलदार ठेवण्याासाठी आपण काकडीचा फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावला पाहिजे. ज्यामुळे त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपण अर्धी काकडी आणि दोन चमचे दही घ्या. काकडीची चांगली पेस्ट तयार करून त्यामध्ये दही मिक्स करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा.

अंड्यामध्ये मध मिसळा आणि दररोज चेहऱ्यावर लावा. हे आपल्या त्वचेला पोषण देईल तसेच एका आठवड्यात आपल्या चेहऱ्यावरही फरक दिसून येईल. सलग 15 दिवस हे केल्यानंतर आपण दर दोन ते तीन दिवसांनी हे लागू शकतो. हे केल्याने आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यास मदत होते. एक चमचा संत्राच्या रसात अंडे घाला आणि चांगले मिसळा. जेंव्हा या मिश्रणाला फेस येतो तेव्हा त्यात अर्धा चमचा हळद घाला आणि चेहऱ्यावर लावा. काही वेळाने हलक्या हाताने चेहऱ्यावर मालिश करा.

हा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला 1 जास्वंद फुल, 1 टीस्पून मध, 2 टीस्पून आवळा पावडर किंवा 1 आवळा लागेल. हा होममेड पेसपॅक तयार करण्यासाठी जास्वंद फुल रात्रभर पाण्यामध्ये भिजू घाला. यानंतर त्या फुलाची बारीक करून पेस्ट बनवा. त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे आवळा पावडर नसेल तर आवळा मिक्स करून त्याची पेस्ट बनवा. आता त्या पेस्टमध्ये एक चमचा मध मिक्स करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. साधारणपणे वीस मिनिटांनी आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(This face pack is beneficial for keeping the skin radiant this season)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI