AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Care Tips | उन्हाळ्यात केस गळतीची समस्या आहे? मग हे घरगुती उपाय करा आणि फरक पाहा!

एरंडेल तेल विविध प्रकारच्या हानिकारक मुक्त रॅडिकल्स आणि जळजळांशी लढण्यास मदत करते. एरंडेल तेलाचा मॉइस्चरायझिंग प्रभाव असतो. परिणामी, केसांच्या कूपांवर एरंडेल तेल लावल्याने केसांवर सौम्य मॉइश्चरायझिंग प्रभाव कायम राहतो. एरंडेलमधील ओमेगा 9 फॅटी अॅसिड केसांच्या वाढीस मदत करतात. केस वेगाने वाढतात.

Hair Care Tips | उन्हाळ्यात केस गळतीची समस्या आहे? मग हे घरगुती उपाय करा आणि फरक पाहा!
Image Credit source: istockphoto.com
| Edited By: | Updated on: May 08, 2022 | 2:59 PM
Share

मुंबई : हंगामी बदलांचा टाळूवर नेहमीच परिणाम होतो. केसगळती, तेलकट केस या समस्या उन्हाळ्याच्या (Summer) हंगामामध्ये प्रामुख्याने निर्माण होतात. बरेच लोक केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी बाजारामधील उत्पादने मोठ्या प्रमाणात वापरतात. मात्र, याचा म्हणावा तसा परिणाम केसांवर होत नाही. यामुळे केस गळतीची (Hair loss) समस्या अधिकच होते. यामुळे या हंगामात केस गळती कमी करण्यासाठी आपण काही खास घरगुती उपाय नक्की करायला हवेत. ज्यामुळे केस गळतीची समस्या (Problem) दूर होऊन आपले केस सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते. हे घरगुती उपाय नेमके कोणते आहेत, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

एरंडेल तेल केसांसाठी फायदेशीर

एरंडेल तेल विविध प्रकारच्या हानिकारक मुक्त रॅडिकल्स आणि जळजळांशी लढण्यास मदत करते. एरंडेल तेलाचा मॉइस्चरायझिंग प्रभाव असतो. परिणामी, केसांच्या कूपांवर एरंडेल तेल लावल्याने केसांवर सौम्य मॉइश्चरायझिंग प्रभाव कायम राहतो. एरंडेलमधील ओमेगा 9 फॅटी अॅसिड केसांच्या वाढीस मदत करतात. केस वेगाने वाढतात. केस दाट होण्यासही मदत होते. एरंडेल तेलात व्हिटॅमिन ई देखील असते जे केसांच्या वाढीस मदत करते. हे जीवनसत्व केसांच्या कूपांमध्ये रक्त प्रवाह वाढवते. त्यामुळे केस मजबूत झाले. एरंडेल तेलामध्ये त्वचा आणि टाळूमध्ये खोलवर प्रवेश करण्याची क्षमता असते. यामुळे छिद्रे स्वच्छ ठेवण्यास देखील मदत होते.

बदाम तेल अशाप्रकारे केसांसाठी वापरा

केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी बदाम तेल देखील अत्यंत फायदेशीर आहे. बदाम तेलामध्ये असे अनेक घटक आहेत की, ते केस गळतीची समस्या दूर करते. 1 अंडे आणि बदामाचे तेल घ्या. अंडी आणि बदाम तेल एकत्र फेटून घ्या. ते केस आणि टाळूवर लावा. तासभर तसंच राहू द्या आणि सौम्य शैम्पूने डोकं धुवा. तुम्ही ते आठवड्यातून एकदा वापरू शकता. यामुळे केसांच्या सर्व समस्या दूर जाण्यास मदत होईल. मात्र, दरवेळी अंडी आणि बदाम तेलाचे मिश्रण हे ताजेच असावे. नाहीतर केसांच्या समस्या अधिक निर्माण होऊ शकतात.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....