Benefits Of Rose Water : सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी गुलाब पाणी अत्यंत फायदेशीर! 

गुलाबाचे पाणी गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांमधून नैसर्गिकरित्या मिळते. हे कॉस्मेटिक आणि आरोग्य फायद्यांसाठी वापरले जाते. गुलाबाच्या पाण्यात सौम्य सुगंध असतो, त्यामुळे त्याचा वापर अत्तर बनवण्यासाठी केला जातो.

Benefits Of Rose Water : सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी गुलाब पाणी अत्यंत फायदेशीर! 
गुलाब पाणी

मुंबई : गुलाबाचे पाणी गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांमधून नैसर्गिकरित्या मिळते. हे कॉस्मेटिक आणि आरोग्य फायद्यांसाठी वापरले जाते. गुलाबाच्या पाण्यात सौम्य सुगंध असतो, त्यामुळे त्याचा वापर अत्तर बनवण्यासाठी केला जातो. गुलाबाच्या पाण्याचे तुमच्या त्वचेसाठी अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया ते त्वचेसाठी कसे फायदेशीर आहे. (Use rose water for beautiful and glowing skin)

पीएच पातळी संतुलित करते – गुलाबाचे पाणी त्याच्या पीएच बॅलेंसिंग गुणधर्मांमुळे त्वचेवर टोनर म्हणून काम करते. हे त्वचेला आराम देते आणि त्वचेला ओलावा देते. हे पीएच पातळी संतुलित करते. यात तुरट गुणधर्म आहेत जे टोनर म्हणून लागू केल्यावर, छिद्र स्वच्छ करतात आणि छिद्रांमधून घाण काढतात. दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर चेहऱ्यावर गुलाब पाणी लावा, यामुळे त्वचेचा टोन सुधारण्यास मदत होते.

त्वचेची जळजळ कमी होते – गुलाब पाणी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. हे त्वचेची जळजळ शांत करण्यास मदत करू शकते आणि सनबर्न शांत करण्यासाठी देखील चांगले कार्य करते. काही अभ्यास असे सुचवतात की, याचा उपयोग एक्जिमा किंवा रोझेसिया शांत करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

त्वचेचा लालसरपणा कमी होतो – गुलाब पाणी त्वचेवर जळजळ आणि लालसरपणा कमी करण्यास देखील मदत करू शकते. गुलाबाच्या पाण्यात असलेले बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म लालसरपणा कमी करण्यास मदत करतो. जर तुम्ही त्वचेच्या लालसरपणामुळे त्रस्त असाल तर त्वचेवर गुलाब पाणी लावा.

गुलाब पाणी अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध – गुलाब पाण्यात अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात. जे तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवण्यास मदत करतात.

त्वचेला करेल हायड्रेट

गुलाब पाण्याने त्वचा नियमित स्वच्छ केल्यामुळे त्वचेच्या आतील धुळ माती निघून जाते. मात्र त्यासोबतच तुमच्या त्वचेतील ओलावादेखील कायम राहतो. त्वचेला पुरेशी आर्द्रता मिळाल्याने तुमच्या त्वचेला एक प्रकारचा तजेदारपणा येतो. यासाठीच उन्हाळ्यात त्वचा फ्रेश दिसावी असं वाटत असेल तर घराबाहेर पडताना एका स्प्रे बॉटलमध्ये गुलाबपाणी भरा आणि सोबत ठेवा. थकवा जाणवू लागल्यास चेहऱ्यावर शिंपडण्यासाठी हे पाणी तुम्ही वापरू शकता. ज्यामुळे तुम्ही लगेच फ्रेश दिसू शकाल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Use rose water for beautiful and glowing skin)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI