Toor Dal for Weightloss: मधुमेह नियंत्रित करण्यापासून वजन कमी करण्यापर्यंत ‘ही’ डाळ ठरेल फायदेशीर…
Toor Dal Benefits: डाळीचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. तुरीची डाळ आरोग्य निरोगी होण्यास मदत होते. तुरीच्या डाळींध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे असतात ज्यामुळे तुमच्या आरोग्याला योग्य पोषण मिळण्यास मदत होते.

भारतीय पदार्थांमध्ये विविध प्रकारच्या डाळींचा समावेश केला जातो. डाळ तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन आढळतात ज्यामुळे तुमचं शरीर निरोगी राहाण्यास मदत होते. वरळ किंवा आमटी बनवण्यासाठी तुर डाळीचा उपयोग केला जातो. अनेकवेळाा पुरणाच्या पोळ्यांमध्ये चणाडाळी ऐवजी तुर डाळीचा वापर केला जातो. दक्षिण भारतामध्ये सांबार बनवण्यासाठी तुर डाळीचा वापर केला जातो. तुरीच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, प्रोटिन, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्वे, मँग्नेशियम, फॉस्परस, सोडियम, पोटॅशियम आणि झिंक असे अनेक पोषक घटक आढळतात ज्यामुळे शरीर निरोगी राहाण्यास मदत होते.
तुरीची डाळ तुमच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. डाळीमधील पोषक घटक तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळण्यास मदत होते. तुरीच्या डाळीचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये उर्जा निर्माण होते तत्यासोतच तुम्हाला मुबलक प्रमाणात प्रोटिन मिळतात. तुर डाळीमध्ये उच्च प्राथिने आणि फायबर आढळतात ज्यामुळे तुमच्या शरीराला आवश्य जीवनसत्वे मिळण्यास मदत होते.
तुरीच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. नियमित तुमच्या डाळीचे सेवन केल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते त्यामधील फायबर जास्त वेळ पोट भरण्यास मदत करते त्यासोबतच तुमचं वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या पोटासंबंधित समस्या असल्यास तुम्ही तुरीच्या डाळीचे सेवन करू शकता. तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही तुरीच्या डाळीचा तुमच्या आहारात समावेश करू शकता. तुरीच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित राहाण्यास मदत होते. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी तुरीच्या डाळीचे सेवन करणे फायदेशीर ठरते. तुरीच्या डाळीचे नियमित सेवन केल्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा धोका निर्माण होत नाही त्यासोबतच हृदयाचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. तुरीच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते आणि पोटाचे आरोग्य निरोगी राहाते. मधुमेहाच्या रूग्णांसाठी तुर डाळ अत्यंत फायदेशीर ठरते. तुरीच्या डाळीमधील पोटॅशियम तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहाण्यास मदत करते आणि मधुमेहाचा धोका कमी होतो. थंडीच्या दिवसांमध्ये तुरीच्या डाळीचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीराला उर्जा मिळते ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे संसर्गाचे आजार होत नाही.
गर्भवती महिलांसाठी तुरीच्या डाळीचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरतात. तुरीच्या डाळीतील फिनोलिक अॅसिड तुमच्या गर्भाची योग्य वाढ करण्यास मदत करते. त्यासोबतच बाळाची योग्य वाढ होण्यास मदत होते. तुरीच्या डाळीमध्ये तुमच्या आरोग्याला फायदेशीर असलेले पोषक तत्वं असतात. परंतु ज्या लोकांना युरिक अॅसिडच्या समस्या असतील अशा लोकांनी तुरीच्या डाळीचे जास्त सेवन करू नये. तुम्हाला कोणत्याही प्रकारची किडणी संबंधित समस्या असतील तर तुरीच्या डाळीचे सेवन करू नये. रात्रच्या जेवणामध्ये तुरीच्या डाळीचे सेवन करू नये कारण रात्री तुरीची डाळ नीट पचत नाही. त्यासोबतच अमीनो अॅसिड कमी असलेल्या लोकांनी तुरीची डाळ पोळी किंवा भातासोबत खावी.