AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Conditioner: अंघोळीच्या अर्धा तास आधी केसांना लावा या 3 गोष्टी, महागडे कंडिशनर सुद्धा यासमोर फेल!

आज आम्ही तुमच्यासाठी हेअर कंडिशनर बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. दही, मोहरीचे तेल आणि लिंबाचा रस अशा स्वयंपाकघरात असलेल्या वस्तूंच्या मदतीने हे कंडिशनर तयार केले जाते. या तीन गोष्टी आपल्या केसांना खोलवर पोषण देतात.

Hair Conditioner: अंघोळीच्या अर्धा तास आधी केसांना लावा या 3 गोष्टी, महागडे कंडिशनर सुद्धा यासमोर फेल!
Hair conditioner
| Updated on: Jul 04, 2023 | 5:08 PM
Share

मुंबई: केस गळण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही महागडे शॅम्पू, हेअर मास्क किंवा ट्रीटमेंट घेता. पण या सर्व पद्धती महागड्या आहेत तसेच केमिकल्सने समृद्ध आहेत. ज्याचा तुमच्या केसांवर काही विशेष परिणाम दिसून येत नाही. आज आम्ही तुमच्यासाठी हेअर कंडिशनर बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. दही, मोहरीचे तेल आणि लिंबाचा रस अशा स्वयंपाकघरात असलेल्या वस्तूंच्या मदतीने हे कंडिशनर तयार केले जाते. या तीन गोष्टी आपल्या केसांना खोलवर पोषण देतात. याने आपले केस मजबूत, मुलायम आणि चमकदार बनतात, तर चला जाणून घेऊया घरगुती हेअर कंडिशनर कसे बनवायचे.

घरगुती हेअर कंडिशनर बनविण्यासाठी लागणारे साहित्य

  • दही
  • मोहरीचे तेल दोन चमचे
  • लिंबाचा रस एक किंवा अर्धा चमचा

घरगुती हेअर कंडिशनर कसे बनवावे?

  • घरगुती हेअर कंडिशनर तयार करण्यासाठी, आपण प्रथम एक वाटी घ्या.
  • नंतर त्यात दही, दोन चमचे मोहरीचे तेल आणि एक-अर्धा चमचा लिंबाचा रस घाला.
  • यानंतर या तिन्ही गोष्टी नीट फेटून सॉफ्ट क्रीमी पेस्ट तयार करा.
  • आता तुमचा होममेड हेअर कंडिशनर तयार आहे.

घरगुती हेअर कंडिशनर कसे वापरावे?

  • घरगुती हेअर कंडिशनर लावण्यापूर्वी, आपल्या केस विंचरा.
  • मग तयार केलेली पेस्ट केसांच्या मुळापासून लांबीपर्यंत चांगली लावा.
  • यानंतर एकतर केस नीट बांधू शकता किंवा टोपीने झाकून घेऊ शकता.
  • मग ही पेस्ट केसांमध्ये कमीत कमी अर्धा ते 1 तास ठेवा.
  • यानंतर आधी पाण्याच्या मदतीने आणि नंतर माइल्ड शॅम्पूच्या मदतीने केस धुवावेत.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.