तुमचे केस सुद्धा पातळ आहेत? तर या’ हेअरस्टाईल टिप्स नक्की फॉलो करा
काही महिलांचे केस पातळ आणि कमी असतात. त्यामुळे या महिलांसाठी कोणत्याही कार्यक्रमात स्टायलिश पद्धतीने हेअरस्टाईल तयार करणे थोडे कठीण होते. अशावेळेस या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही स्टाईल टिप्स बद्दल जाणून घ्या, ज्यांचा अवलंब करून तुमचे केस घनदाट दिसू शकतात.

प्रत्येक स्त्रीला तिचे केस लांब आणि जाड दिसावेत असे वाटते. पण आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच वाढते प्रदुषण यामुळे याचा परिणाम केसांवर होऊ लागलेला आहे. त्यामुळे केसांच्या अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. यासाठी अनेकजण केसांची काळजी घेण्याकरीता घरगुती उपचारांचा अवलंब करत असतात. ज्या महिलांचे व मुलींना काही कार्यक्रमांसाठी हेअरस्टाईल करणे कठिण होऊन जाते . कारण केस पातळ असल्याने काहीजणींना त्यांना हवे असलेले स्टायलिश हेअरस्टाईल तयार करणे थोडे आव्हानात्मक असते. पण केस धुतल्यानंतर ते लवकरच तेलकट दिसू लागतात.
पण जर तुमचेही केस पातळ असण्याच्या समस्येने त्रस्त आहात, तर आम्ही तुम्हाला स्टायलिश आणि सर्वोत्तम हेअरस्टाईल टिप्सबद्दल सांगत आहोत. यामुळे तुमचे केस जाड तर होतीलच पण तुमचा लूकही अधिक स्मार्ट दिसेल. चला तर मग जाणून घेऊयात त्याबद्दल…
योग्य हेअरकट करणे
पातळ केस जाड दिसण्यासाठी, योग्य हेअरस्टाईल असणे खूप महत्वाचे आहे. कधीकधी केसांचा योग्य कट करून केसांचा वॉल्यूम वाढवता येतो. लॉब किंवा बॉब कट तुमच्या केसांना जाड आणि सुंदर लूक देऊ शकतो.
सौम्य स्टाइलिंग टूल्सचा वापर
केस स्ट्रेटनर आणि कर्लिंग साधनांचा वापर शक्य तितके कमी प्रमाणात करा. या साधनांमुळे केसांवर खूप दबाव येतो, ज्यामुळे केस पातळ आणि कमकुवत होऊ शकतात. त्याऐवजी, सौम्य स्टाइलिंग टूल्स वापरा जे तुमच्या केसांना नुकसान न करता त्यांना स्टाईलश लुक देता येतो.
फिनिशिंग आणि स्टाइलिंग
केसांना स्टाईल करताना हेअर स्प्रे आणि मूस वापरा. केसांना सेट करण्यासोबतच ते केसांना बराच काळ जाड ठेवते. याव्यतिरिक्त, तुम्ही हलके कर्ल किंवा व्हेव्स देखील तयार करू शकता, ज्यामुळे पातळ केस जाड आणि घनदाट दिसतात.
अरोमाथेरपी तेलाने मालिश करा
चांगल्या तेलाने केसांची मालिश करणे हा देखील एक उत्तम मार्ग आहे. केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठी ऑलिव्ह ऑइल, नारळ तेल आणि बदाम तेल उत्तम आहे. तसेच केसांना तेल मालिश केल्याने केसांमध्ये रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे केसांची वाढ सुधारते आणि ते जाड आणि मजबूत होतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
