AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाज्या स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती? फक्त पाणी नाही तर… शेवटचा उपाय नक्की ट्राय करा

भाज्या आणि फळांवरील कीटकनाशके काढून टाकण्यासाठी उत्तम घरगुती उपाय. मीठ, हळद आणि व्हिनेगरचा वापर करून आपल्या कुटुंबाला विषारी रसायनांपासून कसे सुरक्षित ठेवावे याची सविस्तर माहिती.

भाज्या स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती? फक्त पाणी नाही तर... शेवटचा उपाय नक्की ट्राय करा
clean vegetables at home
| Updated on: Jan 14, 2026 | 2:25 PM
Share

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आरोग्यासाठी ताज्या पालेभाज्या आणि फळांना प्राधान्य देतो. मात्र या भाज्या शेतातून आपल्या ताटापर्यंत येताना त्यावर मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा (Pesticides) आणि रसायनांचा मारा केलेला असतो. त्यामुळे जर तुम्हीही केवळ साध्या पाण्याने भाज्या धुवत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात.

भाज्या केवळ पाण्याने धुतल्याने ही रसायने निघून जात नाहीत. ज्यामुळे कालांतराने कर्करोग, पोटाचे विकार आणि हार्मोनल असंतुलन यांसारख्या गंभीर आजारांना होऊ शकतात. त्यामुळे जर तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी भाज्या स्वच्छ धुण्याच्या काही सोप्या घरगुती टीप्स आज आपण जाणून घेणार आहोत.

१. मिठाचे पाणी : कीटकनाशके घालवण्यासाठी मीठ हा सर्वात स्वस्त आणि प्रभावी मार्ग आहे. एका मोठ्या टबमध्ये पाणी घेऊन त्यात २ चमचे समुद्री मीठ (मीठाचे मोठे खडे) टाका. या पाण्यात भाज्या २० मिनिटे भिजत ठेवा. त्यानंतर साध्या नळाच्या पाण्याखाली त्या पुन्हा एकदा स्वच्छ धुवा.

२. बेकिंग सोडा : अनेक संशोधनानुसार, बेकिंग सोड्याचे पाणी कीटकनाशके काढून टाकण्यासाठी सर्वात प्रभावी मानले जाते. यासाठी १ लीटर पाण्यात साधारण १ चमचा बेकिंग सोडा मिसळा. साधारण १२ ते १५ मिनिटे भाज्या त्या पाण्यात ठेवा. हे द्राव्य भाज्यांवरील चिकट रसायने काढून टाकण्यास मदत करते.

३. व्हिनेगर : व्हिनेगरमधील आम्लयुक्त (Acidic) गुणधर्म केवळ रसायनेच नाही तर भाज्यांवरील जीवाणू देखील नष्ट करतात. यासाठी पाण्याचे आणि पांढऱ्या व्हिनेगरचे ३:१ असे प्रमाण ठेवा. जर ३ कप पाणी असेल तर १ कप व्हिनेगर घ्या. द्राक्षे, बेरीज आणि सफरचंद यांसारख्या फळांसाठी हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे.

४. गरम पाणी, हळद आणि मीठ : फ्लॉवर, ब्रोकोली किंवा कोबी यांसारख्या भाज्यांमध्ये बारीक किडे लपलेले असतात, जे डोळ्यांना सहज दिसत नाहीत. कोमट पाण्यात चिमूटभर हळद आणि मीठ टाका. हळद ही नैसर्गिक जंतुनाशक (Antiseptic) म्हणून काम करते, ज्यामुळे भाजी पूर्णपणे निर्जंतुक होते.

५. साल काढणे : काकडी, बटाटा, गाजर किंवा सफरचंद यांसारख्या भाज्या आणि फळांच्या सालीमध्ये रसायनांचे प्रमाण सर्वाधिक असते. शक्य असल्यास त्यांची साल काढूनच वापर करा. यामुळे कीटकनाशकांचा धोका ९० टक्क्यांपर्यंत कमी होतो. भाज्या बाजारातून आणल्यानंतर लगेच फ्रीजमध्ये न ठेवता, आधी त्या वरीलपैकी एका पद्धतीने स्वच्छ करा, पूर्ण कोरड्या करा आणि मगच साठवून ठेवा. यामुळे त्या जास्त काळ टिकतात.

ठाकरे बंधु सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला | VIDEO
ठाकरे बंधु सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला | VIDEO.
पाडू मशीन कधी आणि का वापरणार? भूषण गगराणींनी सर्व सांगितलं
पाडू मशीन कधी आणि का वापरणार? भूषण गगराणींनी सर्व सांगितलं.
BMC Election 2026 : EVM ला जोडणारं पाडू मशीन म्हणजे काय? जाणून घ्या
BMC Election 2026 : EVM ला जोडणारं पाडू मशीन म्हणजे काय? जाणून घ्या.
मतदानाच्या दिवशी ईव्हीएमसोबत नवीन मशीन... राज ठाकरे प्रचंड संतापले
मतदानाच्या दिवशी ईव्हीएमसोबत नवीन मशीन... राज ठाकरे प्रचंड संतापले.
पालिकेच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात; निवडणूक साहित्याच वाटप सुरू
पालिकेच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात; निवडणूक साहित्याच वाटप सुरू.
बिनविरोध निवडीवरची सुनावणी संपली, काय घडलं कोर्टात?; मोठा निर्णय काय?
बिनविरोध निवडीवरची सुनावणी संपली, काय घडलं कोर्टात?; मोठा निर्णय काय?.
संक्रातिनिमित्त नाशिकच्या गोदा घाट परिसरात पर्यटक, भाविकांची गर्दी
संक्रातिनिमित्त नाशिकच्या गोदा घाट परिसरात पर्यटक, भाविकांची गर्दी.
ठाकरे कुटुंबातला गोडवा वाढला! संक्रांतीसाठी दोन्ही कुटुंब शिवतीर्थवर
ठाकरे कुटुंबातला गोडवा वाढला! संक्रांतीसाठी दोन्ही कुटुंब शिवतीर्थवर.
अचानक येऊन तलवारीने हल्ला, उमेदवाराचा नवरा... काय घडलं?; नांदेड हादरलं
अचानक येऊन तलवारीने हल्ला, उमेदवाराचा नवरा... काय घडलं?; नांदेड हादरलं.
पाच-पाच हजार वाटले जातायत! राज ठाकरेंचा गंभीर आरोप
पाच-पाच हजार वाटले जातायत! राज ठाकरेंचा गंभीर आरोप.