AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधनाच्या दिवशी पाठवा लाडक्या भावा-बहिणीला पाठवा शुभेच्छा संदेश

बहीण- भावाच्या पवित्र नाते संबंधाचा रक्षाबंधन सण सोमवारी 19 ऑगस्ट रोजी सर्वत्र साजरा होत आहे. या सणाच्या निमित्ताने बहिण आणि भावांना शुभेच्छा देणारे काही संदेश पाहूयात...

Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधनाच्या दिवशी पाठवा लाडक्या भावा-बहिणीला पाठवा शुभेच्छा संदेश
raksha bandhan
| Updated on: Aug 18, 2024 | 5:18 PM
Share

भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा हा रक्षाबंधनाचा सण यंदा 19 ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. दरवर्षी हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिला आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देत असतो. रक्षा बंधनाचा हा सण खूप पुरातन असून इतिहासात देखील त्याचे अनेक दाखले पाहायला मिळतात.

पौराणिक कथामध्ये रक्षा बंधनाच्या सणाचे दाखले आढळतात,महाभारतात श्रीकृष्णाचे बोट सुदर्शन चक्रामुळे कापली गेली होती, तेव्हा द्रौपदी हीने आपला अंगावरील ओढणी फाडून भगवान कृष्णाची जखमेवर बांधली होती. त्याच वेळी श्रीकृष्णाने द्रौपदीला रक्षणाचे वचन दिले होते. त्यामुळे अध्यात्म आणि शास्रात या सणाला खूपच महत्व आहे.

जे भाऊ आणि बहीण एकत्र राहातात त्यांना व्हर्च्युअल जगाचा आधार घेण्याची गरज लागत नाही. परंतू जे भाऊ आणि बहीण एकमेकांपासून दूर रहातात त्यांना एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठविण्यासाठी सोशल मिडीयाचा आधार घ्यावा लागत असतो.या सणाच्या निमित्ताने ते एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवितात. या तुमच्यासाठी रक्षाबंधनाच्या सणाचे काही संदेश आम्ही घेऊन आलो आहोत. या शुभेच्या संदेशांना तुम्ही भावाला किंवा बहिणीला पाठवू शकता. किंवा नातेवाईकांना पाठवू शकता…

रक्षाबंधन सणासाठी काही शुभेच्छा संदेश

  • नातं हे प्रेमाचं नितळ अन् निखळ, मी सदैव जपलंय, हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी, आज सारं सारं आठवलंय हातातल्या राखीसोबतच, ताई तुझं प्रेम मनी मी साठवलंय….
  • बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी बांधिते भाऊराया.. आज तुझ्या हाती औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीपज्योती, रक्षावे मज सदैव, अन् अशीच फुलावी प्रीती, बंधन असूनही, बंधन हे थोडेच, यात हळव्या रेशीमगाठी उजळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते, नेहमी माझ्या मनात दादाला भेटण्याची आस असते…
  • आयुष्याच्या प्रत्येक वळणार असेल हातात हात, अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही असेल माझी तुला साथ…
  • रक्षणाचे वजन, प्रेमाचे बंधन घेऊन आला हा श्रावण, लाखलाख शुभेच्छा तुला आज आहे, बहिण-भावाचा पवित्र सण
  • काही नाती खूप अनमोल असतात हातातील, राखी मला याची कायम आठवण करुन देत राहील तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये, आणि आलच तर त्याला आधी, मला सामोरे जाले लागेल…
  • राखी आपलं नातं जोडणारा एक रेशीम धागा
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.