Diwali Shopping | दिवाळीसाठी खरेदी करताय? मग, ड्रेस घेण्यापूर्वी बॉलिवूड ‘दिवां’चे लूक नक्की पाहा!

अशावेळी आपल्यापैकी बरेच लोक विशेषतः स्त्रिया ड्रेसिंग स्टाईल आणि लुकबद्दलही संभ्रमात असतात.

  • Updated On - 1:28 pm, Mon, 7 December 20 Edited By: नम्रता पाटील, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
Diwali Shopping | दिवाळीसाठी खरेदी करताय? मग, ड्रेस घेण्यापूर्वी बॉलिवूड ‘दिवां’चे लूक नक्की पाहा!

मुंबई :  दरवर्षी प्रमाणे आपल्या सर्वांच्या घरी दिवाळीच्या सणाची तयारी सुरू झालेली आहे. फराळाप्रमाणेच कपड्यांच्या खरेदीसाठी देखील लगबग सुरू झाली आहे. अशावेळी आपल्यापैकी बरेच लोक विशेषतः स्त्रिया ड्रेसिंग स्टाईल आणि लुकबद्दलही संभ्रमात असतात. त्यामुळे दिवाळीसाठी नेमके काय कपडे खरेदी करायचे याबद्दल दुमत होत असते. मात्र, तुम्ही खूपच गोंधळला असाल, तर या बॉलिवूड ‘दिवां’चे स्टायलिश लूक पाहून, तुम्हीही त्यातून प्रेरणा घेऊ शकता. त्यांच्या या लूकमुळे तुम्हालाही नव्या कल्पना नक्की मिळतील.(Bollywood celebrities look for Diwali)

 

सारा अली खान

सारा अली खान तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. साराला अनेक वेळा भारतीय ड्रेसमध्ये स्पॉट केले गेले आहे. जर आपल्याला काळा रंग आवडत असेल तर आपल्यासाठी तिचा हा लेहंगा एक चांगला पर्याय असू शकतो. साराने ब्लॅक सिमरी लेहेंग्यासह ग्लीटरी ब्लाऊज घातला होता. तिच्या लेहेंग्यावर पिवळ्या फुलांच्या भरतकामासह सोनेरी रंगाच्या लेसचे नक्षीकामहोते. साराने तिच्या ड्रेससह सोनेरी रंगाच्या बांगड्या घातल्या होत्या.

 

अनन्या पांडे

अनन्या पांडेनेही एका कार्यक्रमादरम्यान काळ्या रंगाचा रंगीबेरंगी डिझाईनचा लेहंगा घातला होता. अनन्याने परिधान केलेला हा ड्रेस अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाईन केला होता. अनन्याच्या लेहेंग्यावर मिररवर्क केलेले होते. या ड्रेससह साध्या कानातल्यांनी तिने आपला हा लूक पूर्ण केला. (Bollywood celebrities look for Diwali)

 

आलिया भट्ट

आलिया भट्टने एका सोहळ्याला डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला काळ्या रंगाचा लेहेंगा घातला होता. त्यासह काळ्या रंगाचा साधा ब्लाऊज परिधान केला होता. तुम्ही या ऐवजी क्रॉप टॉप घालू शकता. आलियाच्या या लेहेंग्यावर भरतकाम केले होते. तिच्या दुपट्ट्यावरही जरीकाम करण्यात आले होते. यासह मोठ्या आकाराचे कानातले घालून तिने आपला हा लूक पूर्ण केला.

 

करिना कपूर-खान

करिना कपूर-खान नेहमीच आपल्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. बेबोचा लूक नेहमीच हटके आणि वेगळा असतो. या लेहेंगामध्ये करिनाने ब्लॅक अँड व्हाईट रंगाचा कॉन्ट्रास्ट लूक परिधान केला होता. बेबोने त्यासह सोनेरी रंगाचे कानातले घातले होते. (Bollywood celebrities look for Diwali)

 

कतरिना कैफ

कतरिना कैफने फुल स्लीव्ह ब्लाऊजसह फ्लोरल लेहेंगा घातला होता. कतरिनाचा हा लेहेंगा प्रसिद्ध डिझायनर सब्यसाची यांनी तयार केला होता. कतरिनाने त्याच्याबरोबर मॅचिंग ओढणी आणि मोठे सिल्व्हर कानातले घातले होते.

कियारा अडवाणी

जर तुम्हाला अगदी साध्या कपड्यांची आवड असेल तर, कियारा अडवाणीचा हा लेहेंगा नक्की पसंत पडेल. कियाराने गुलाबी आणि यलो पाइपिंग कॉन्ट्रास्ट स्कार्फसह ब्लॅक लेहेंगा परिधान केला होता. यासह तिने हलके परंतु मोठे कानातले घातले होते.

(Bollywood celebrities look for Diwali)