Diet Tips for Busy People: कामात व्यस्त आहात; एनर्जी पुरत नाही, मग खा ‘या’ गोष्टी, उर्जा ही देतील आणि निरोगी आयुष्यही

Diet Tips for Busy People: कामात व्यस्त आहात; एनर्जी पुरत नाही, मग खा 'या' गोष्टी, उर्जा ही देतील आणि निरोगी आयुष्यही
Image Credit source: tv9

बिया आणि नट शरीराला भरपूर ऊर्जा देतात, कारण ते भरपूर ऊर्जेने भरलेले असतात. याव्यतिरिक्त, जीवनसत्त्वे, खनिजे आहेत. जे संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक आहेत. दररोज 3-4 बदाम आणि 1-2 अक्रोड पाण्यात भिजवून खा. बदामामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. हे शरीरात जाऊन दाहक-विरोधी तत्वाचे काम करते. तसेच, हे मेंदूची कार्य क्षमता सुधारते, स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करते.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

May 26, 2022 | 11:06 PM

Diet Tips for Busy People : आजकाल आपल्या पहाण्यात ऐकण्यात एक शब्द कानावर सारखा येतो… काय वेळ नाही वाटतं. बिझी (busy) आहे. तर अनेकजनांना घरातून, ऑफिसमधून (Office) किंवा इतर वैयक्तिक कामातून वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या खाण्याकडे लक्ष देता येत नाही. आरोग्यदायी गोष्टी त्यांच्या शरीरात कमी आणि अनारोग्यकारक पदार्थ जास्त जातात. कारण दिवसभर काम करून थकवा आल्यावर आणि वेळेअभावी जे काही अन्नपदार्थ पटकन तयार केले जातात ते लोक खातात. प्रक्रिया केलेले अन्न, पॅक केलेले अन्न, खाण्यासाठी तयार पदार्थ तुमचे पोट नक्कीच भरतात. मात्र ते पौष्टिक घटक देत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही शारीरिकदृष्ट्या अशक्त होऊ शकता. तुम्हाला उर्जेची कमतरता जाणवू शकते. तुम्ही तुमच्या कामात खूप व्यस्त असाल तर तुमच्या आहारात काही आरोग्यदायी पदार्थांचा (healthy foods) नक्कीच समावेश करणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेलच त्याचबरोबर निरोगी आयुष्य ही.

भरपूर फळे आणि भाज्या खा

TOI मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, फळे आणि भाज्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात, जे निरोगी शरीरासाठी खूप महत्वाचे असतात. हिरव्या भाज्या आणि फळांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर असतात, जे शरीर निरोगी ठेवतात. त्यापैकी किमान 4-5 सर्विंग्स दिवसभर खाल्ल्या पाहिजेत. कापलेली फळे खावीत, ज्यूस बनवून प्यावे, भाज्या जास्त शिजवल्यानंतर खाऊ नयेत, जेणेकरून जास्तीत जास्त पोषक तत्वे मिळतील.

बाजरी, ज्वारी भरपूर खा

तुम्ही दररोज गव्हापासून बनवलेल्या रोटी आणि तांदूळाचे सेवन करता, परंतु ते मर्यादित प्रमाणात खा, कारण पांढरा तांदूळ तपकिरी किंवा काळ्या तांदळाच्या तुलनेत तितका आरोग्यदायी नाही. तुम्ही त्यांचे सेवन देखील करा, पण तुमच्या आहारात रोट्या, नाचणी, ज्वारी, बाजरी यांसारख्या संपूर्ण धान्यापासून बनवलेल्या पदार्थांचाही समावेश करा. त्यामुळे पचनक्रिया बरोबर राहते. पोट साफ होते. बाजरी, ज्वारी, नाचणी इत्यादींमध्ये फायबर, प्रथिने, अँटिऑक्सिडंट असतात तसेच ते ग्लुटेनमुक्त देखील असतात. शरीराला ऊर्जा मिळेल.

मसूर पण खा

बरेच लोक कडधान्यांचे नियमित सेवन करत नाहीत, तर निरोगी राहण्यासाठी हे खूप महत्वाचे धान्य आहे. कडधान्ये हा पोषक तत्वांचा खजिना आहे. मसूर डाळीमध्ये भरपूर प्रोटीन असते, जे डोळ्यांसाठी खूप आरोग्यदायी असते. तुम्हाला दीर्घायुष्यासाठी निरोगी राहून तुमचे काम करत राहायचे असेल, तर रोज डाळींचा आहारात समावेश करा. बीन्स, कडधान्ये, शेंगा प्रत्येक दिवसाची प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या गरजा भागवतात. कडधान्य, सोयाबीन, शेंगा खाल्ल्याने शरीर मजबूत होते.

नट्स खाणे महत्वाचे आहे

बिया आणि नट शरीराला भरपूर ऊर्जा देतात, कारण ते भरपूर ऊर्जेने भरलेले असतात. याव्यतिरिक्त, जीवनसत्त्वे, खनिजे आहेत. जे संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक आहेत. दररोज 3-4 बदाम आणि 1-2 अक्रोड पाण्यात भिजवून खा. बदामामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. हे शरीरात जाऊन दाहक-विरोधी तत्वाचे काम करते. तसेच, हे मेंदूची कार्य क्षमता सुधारते, स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करते. त्याचप्रमाणे तुम्ही काही बिया जसे की सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, चिया बिया, फ्लेक्ससीड्स इत्यादींचे सेवन करावे. त्यामध्ये प्रथिने, फायबर, अँटिऑक्सिडंट्स, मोनोसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स सारख्या चांगल्या चरबी असतात, ज्यामुळे उच्च रक्त कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते, ज्यामुळे हृदयरोग, पक्षाघाताचा धोका कमी होतो.

हे सुद्धा वाचा

स्वतःला हायड्रेटेड ठेवा

उन्हाळा तीव्र होत आहे, त्यामुळे शरीरातील पाणी आणि उर्जेची पातळी कमी होऊ नये म्हणून शरीराला हायड्रेट ठेवण्याची गरज आहे. द्रवपदार्थांचे सेवन केल्याने दिवसभर शरीरातील ऊर्जा पातळी योग्य प्रकारे राखली जाते. पाणी आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. पुरेसे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. शरीराचे तापमान योग्य राहते. रक्तदाब राखला जातो. पचनसंस्था सुधारते. त्वचा आणि केस निरोगी राहतात. साखरयुक्त पेये पिण्याऐवजी जास्तीत जास्त पाणी प्या.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें