Chankya Niti For Mens : पुरुषांनी या गोष्टी शक्यतो गुप्तच ठेवाव्या, अन्यथा समाजात होईल हसे

समाजात मान आणि प्रतिष्ठा राखायची असेल तर आपल्या काही बाबी गुप्तच राहु द्या. आचार्य चाणक्य यांच्या मते खास करुन पुरुषांनी काही बाबींचा जाहीरपणे उल्लेख करु नये यामुळे तुम्ही समाजात टिंगलटवाळीचे विषय व्हाल...

Chankya Niti For Mens : पुरुषांनी या गोष्टी शक्यतो गुप्तच ठेवाव्या, अन्यथा समाजात होईल हसे
Chanakya Niti For Mens Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jun 17, 2024 | 9:15 PM

आचार्य चाणक्य यांना अर्थशास्रज्ञ आणि राजकीय मुत्सदी आणि परराष्ट्रनितीसाठी देखील ओळखले जाते. त्यांचे कौटिल्याचे अर्थशास्र हे प्रसिद्ध आहेच. शिवाय त्यांनी सामाजिक आणि राजकीय जीवनात देखील कसे राहावे याचे मंत्र सांगितले आहेत. यामुळे व्यक्ती सुखी आणि समृद्ध तसेच प्रतिष्ठीत जीवन जगू शकतो असे आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे.

आचार्य चाणक्य यांची वाणी चाणक्य निती म्हणून गाजली आहे. त्यांनी समाजाला केलेला उपदेश सर्वांनाच उद् बोधक आहे. तर पाहूयात चाणक्य नितीप्रमाणे समाजात वावरताना काय करावे. चाणक्यने प्रत्येक क्षेत्रातील जनमाणसाची काळजी घेतली आहे. चाणक्य निती वापरुन आपण जीवनात प्रगती करु शकता. सुखी आणि समाधानी जीवनासाठी चाणक्य निती गरजेची आहे. आपण सर्व एकाच सामाजिक परिवेषात राहतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला हे गरजेचे आहे की घर आणि परिवारासोबतच समाजात देखील आपला मान सन्मान राहील हे पाहीले पाहीजे.

पुरुषांनी या बाबी गुप्त ठेवाव्यात :

घर आणि कुटुंब किंवा पत्नी संबधीत बाबी – पुरुषांनी आपल्या घरातील आणि कुटुंबातील वाद – विवाद, घरातील कोणत्याही गोष्टीची बाहेर वाच्छता करणे चुकीचे आहे. जर आपल्या पत्नीबद्दल कोणत्याही गोष्टीबद्दल नाराज होऊन तिच्या चरित्र, व्यवहार आणि सवयींबाबत कोणालाही सांगू नका. या गोष्टी सांगितल्याने त्यावेळी जरी काही झाले नाही तरी नंतर त्याचे नुकसान भोगायला लागू शकते हे लक्षात ठेवा.

अपमान झाल्याचे सांगू नका :

जर आपला कोणत्याही कारणांनी यापूर्वी जर अपमान झाला असेल तर मस्करीतही कोणालाही ते सांगू नका. सर्वसाधारणपणे मस्ती मजाकमध्ये आपण या गोष्टी जवळच्या व्यक्तींना किंवा मित्रांना सांगतो. परंतू अपमान झाल्याच्या बाबी जितक्या गुप्त ठेवता येतील तेवढ्या ठेवाव्यात. जरी आपला अपमान झाला असेल तर तो स्वत: जवळच ठेवावा. अपमानाचे घोट स्वत:च गुपचुप गिळावेत जगजाहीर करु नयेत..

पैशांच्या बाबतीतील दक्षता :

धनसंपती कोणाला नको असते. प्रत्येकाला श्रीमंत आणि समर्थ बनायचे असते. आजच्या काळात पैसा सर्वात मोठी ताकद आहे. परंतू आपल्या आर्थिक स्थितीबाबत कोणालाही काही सांगू नये. असे केल्याने समाजात आपला सन्मान कमी होतो. आणि जेव्हा दुसऱ्याला कळते की आपल्याजवळ पैसा नाही तेव्हा ते आपल्याला टाळायला लागतात. त्यांना वाटते की हा आपल्याकडे पैसे मागायला आला आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.