चिकन की पाया सूप, हिवाळ्यात कोणते सूप पिल्याने जास्त ताकद मिळते? तज्ज्ञांनी दिली माहिती
Chicken Soup Benefits : थंडीच्या दिवसांमध्ये गरम सूप पिण्यात शब्दात न सांगण्यासारखा आनंद मिळतो. मांसाहारी लोक चिकन किंवा मटण पाया सूप पितात. या दोन्हीपैकी कोणते सूप आरोग्यासाठी फायदेशीर आहे ते जाणून घेऊयात.

हिवाळ्याला सुरुवात झाली आहे, अनेक भागात तापमान घसरले आहे. थंडीच्या दिवसांमध्ये गरम सूप पिण्यात शब्दात न सांगण्यासारखा आनंद मिळतो. मांसाहारी लोक चिकन किंवा मटण पाया सूप पितात. यामुळे शरीर उबदार राहते आणि यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. मात्र परंतु लोक अनेकदा गोंधळात पडतात की चिकन की पाया कोणते सूप शरीरासाठी फायदेशीर असते. दोन्ही खूप स्वादिष्ट असतात तसेच त्यात अनेक पोषक तत्वे असतात. या दोन्हीपैकी कोणत्या सूपमुळे शरीराला जास्त ऊर्जा मिळते ते जाणून घेऊयात.
मटण पाया सूपचे फायदे
हिवाळ्यात बरेच लोक मटण पाया सूप पितात. हे सूप पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे. यात प्रोटीन, आयर्न आणि व्हिटॅमिन बी 12 असे पोषक घटक असतात. हे सूप स्नायू तयार करण्यास आणि ऊर्जा वाढविण्यास मदत करतात. हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी मटण पाया खूप फायदेशीर आहे. जेव्हा मटना पाया सूप जास्त वेळ शिजवला जातो, त्यावेळी त्यातील कॅल्शियम, फॉस्फरस, इतर खनिजे, कोलेजन (जिलेटिन), अमिनो अॅसिड हे घटक सूपमध्ये मिक्स होतात. यामुळे हाडे मजबूत होतात.
न्यूट्रिशन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात मटण पाया सूपचे फायदे सांगण्यात आले आहेत. या सूपमधील अमिनो अॅसिड जळजळ कमी करण्यास मदत करतात. तसेच त्यात असे काही घटक असतात, ज्यामुळे हिवाळ्यात सर्दी आणि खोकला बरा होता. पायासूपमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे ते हाडे आणि दातांसाठी फायदेशीर ठरते.
चिकन सूपमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त
हिवाळ्यात अनेक लोक गरम चिकन सूप पिणे पसंत करतात. यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. यामुळे स्नायूंची ताकद वाढते. तसेच चिकन सूपमध्ये नियासिन (व्हिटॅमिन बी3), सेलेनियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन बी6 आणि बी12 देखील असते. हेल्थलाइनच्या मते, चिकन सूप पिल्यामुळे हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तसेच यामुळे सर्दी होत नाही. यामुळे पचन सुधारते आणि पोट शांत होते.
चिकन की पाया…कोणते सूप चांगले आहे?
दिल्लीतील गंगा राम हॉस्पिटलमधील वरिष्ठ आहारतज्ज्ञ फरेहा शनम यांनी सांगितले की,चिकन आणि पाया सूप दोन्हीचे खूप फायदे आहेत. चिकनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते, तर मटण पाया सूपमध्ये पोषक घटक असतात. जर एखाद्याला फ्रॅक्चर झाले असेल किंवा सांधेदुखीचा त्रास असेल तर त्या व्यक्तीने पाया सूप प्यावे. ज्या लोकांना प्रोटीनची आवश्यकता असते अशा लोकांनी चिकन सूप प्यावे. तुम्ही दररोज चिकन सूप पिऊ शकता, मात्र मटण पाया सूपमध्ये चरबीचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे तुम्ही ते दररोज सेवन करू शकत नाही.
