AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chocolate Day 2021 | बॉलिवूडकर म्हणतात ‘चॉकलेटसाठी काहीही…’, फिटनेसच्या बाबतीतही तडजोडीला तयार!

‘व्हॅलेंटाईन वीक’मध्ये उद्या अर्थात 9 फेब्रुवारी रोजी ‘चॉकलेट डे’ (Chocolate day 2021) आहे. प्रेमाची सुरूवात काहीतरी गोड खाऊन व्हावी आणि यासाठी चॉकलेटपेक्षा अधिक चांगले काय असू शकते...

Chocolate Day 2021 | बॉलिवूडकर म्हणतात ‘चॉकलेटसाठी काहीही...’, फिटनेसच्या बाबतीतही तडजोडीला तयार!
चॉकलेट डे
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Feb 08, 2021 | 2:42 PM
Share

मुंबई : ‘व्हॅलेंटाईन वीक’मध्ये उद्या अर्थात 9 फेब्रुवारी रोजी ‘चॉकलेट डे’ (Chocolate day 2021) आहे. प्रेमाची सुरूवात काहीतरी गोड खाऊन व्हावी आणि यासाठी चॉकलेटपेक्षा अधिक चांगले काय असू शकते… या दिवशी तुम्ही चॉकलेट देऊन आपल्या प्रेमात अधिक गोडवा आणू शकता. चॉकलेट ही एक गोष्ट आहे जी प्रत्येकाला आवडते. फिटनेस फ्रीक असलेल्या बर्‍याच सेलेब्सनाही त्यांच्या चॉकलेट खाण्याच्या सवयीमुळे फिटनेसशी तडजोड करावी लागते (Chocolate Day 2021 Special fitness freak Bollywood celebs who love to eat chocolate).

आज आम्ही तुम्हाला अशाच काही सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत जे चॉकलेट खाण्यासाठी काहीही करू शकतात. बऱ्याच सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर चॉकलेटबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे. या यादीमध्ये दीपिका, करिना आणि रणवीर सिंह यांच्यासारख्या फिटनेस फ्रीक कलाकारांचादेखील समावेश आहे.

दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोणला डार्क चॉकलेट खाणे खूप आवडते. तिने अनेकदा सोशल मीडियावरुन चॉकलेटवरचे प्रेम व्यक्त केले आहे. दीपिकाने एकदा सांगितले होते की, तिला हॉट चॉकलेट खूप आवडते. दीपिका अनेकदा चॉकलेटचे फोटो शेअर करत असते.

करिना कपूर खान

बेबो बॉलिवूडमधील सर्वात तंदुरुस्त अभिनेत्री आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती बरीच कठोर कसरत करत असते, पण चॉकलेट पाहून तिला स्वत:वर नियंत्रण ठेवता येत नाही. लॉकडाऊनमध्येही करिनाने चॉकलेट केकचा खूप आनंद लुटला. अनेक वेळा करिश्मानेही करिनासाठी केक्स पाठवले होते.

रणवीर सिंह

पत्नी दीपिकाप्रमाणेच पती रणवीर सिंहही चॉकलेटचा चाहता आहे. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, चॉकलेटसाठी तो काहीही करू शकतो. त्याच्या फिटनेस प्रशिक्षकांनाही रणवीरची ही सवय मोडता आलेली नाही (Chocolate Day 2021 Special fitness freak Bollywood celebs who love to eat chocolate).

सोनम कपूर

सोनम कपूर एक हार्डकोर चॉकलेट प्रेमी आहे, याचा पुरावा म्हणजे ती स्वत: स्वतःसाठी भरपूर चॉकलेट चिप्सच्या कुकीज बनवत असते. सोनमला संधी मिळताच ती चॉकलेट खायला सुरु करते.

आलिया भट्ट

आलिया भट्ट देखील चॉकलेट प्रेमी आहे. तिचा फिटनेस बघून तुम्ही असा अंदाज लावू शकत नाही की, ती खूप चॉकलेट खाते. एवढेच नव्हे तर नुकत्याच एका मुलाखतीत चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना आलिया म्हणाली की, तिला बटाटे आणि चॉकलेट खायला खूप आवडते.

डायना पेंटी

अभिनेत्री डायना पेंटीला सर्व प्रकारचे चॉकलेट खायला आवडतात. तिला चॉकलेट तसेच चॉकलेट ड्रिंक्स देखील आवडतात. डायनाचे चॉकलेटवरचे प्रेम तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही पाहायला मिळते. डायनाने अनेक वेळा चॉकलेट खातानाचे तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

(Chocolate Day 2021 Special fitness freak Bollywood celebs who love to eat chocolate)

हेही वाचा :

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...