AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकदा वापरलेला ‘मास्क’ परत वापरल्यावर होऊ शकतात हे दुष्परिणाम

कोरोना व्हायरसच्या काळात लोकांच्या जीवनशैलीत खूपबदल झालेले आपल्या लक्षात येईल. खाणे, पिणे देखील बदलले आहे.

एकदा वापरलेला 'मास्क' परत वापरल्यावर होऊ शकतात हे दुष्परिणाम
| Updated on: Dec 20, 2020 | 4:27 PM
Share

मुंबई : कोरोना व्हायरसच्या काळात लोकांच्या जीवनशैलीत खूपबदल झालेले आपल्या लक्षात येईल. खाणे, पिणे देखील बदलले आहे. लोक आता जागरूक झाले आहेत, आणि कोरोनापासून दुर राहण्यासाठी लोक मास्कचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. कोरोनापासून दूर राहायचे असेलतर मास्क सर्वात उत्तम पर्याय आहे. परंतु यामध्ये आपल्याला एक गोष्ट माहित असणे आवश्यक आहे. ती म्हणजे चांगल्या प्रतीचा मास्क 70% पर्यंत संक्रमणाचा धोका कमी करतो. आज बाजारात बरेच प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत, जे लोक वापरत आहेत. (Consistent use of the same mask can cause side effects)

नुकत्याच झालेल्या संशोधनात असे आढळले आहे की, एकच मास्क तुम्ही सारखा वापर असाल तर ते अतिशय धोकादायक आहे. जेव्हा आपण तोच मास्क पुन्हा पुन्हा वापरतो तेव्हा तो सैल होतो. संशोधकांनी सांगितले की, आपण जेव्हा बाहेर फिरतो त्यावेळी घामामुळे तो मास्क खराब होता. पुन्हा पुन्हा तो मास्क वापर असतोल तर त्याचे फॅब्रिक कसे आहे ते तपासून पहा. सतत एकच मास्क घातल्यास ते खराब होऊ शकते. आणि त्यांची गुणवत्ता कमी होते.

आपण पुन्हा डिस्पोजेबल मास्क वापरत असल्यास, हे करू नका. म्हणून नेहमी नवीन मास्क वापरणे कधीही चांगले आहे. अधिक प्रवास करणारे आणि वैद्यकीय संस्थांमध्ये काम करणार्‍या लोकांनी सतत मास्क बदलला पाहिजे. आपल्या आरोग्याबद्दल खरोखर काळजी असल्यास आपण जवळ शक्यतो जास्त मास्कसोबत ठेवावे. मास्क जर धुतल्यामुळे लुज पडला असेलतर शक्यतो असा मास्क वापरू नये.

यावर्षी हंगामी आजारांत दिसली घट!

शालिमार बागच्या मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्येही टायफॉईडशी संबंधित प्रकरणांमध्ये सुमारे 50 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. तर, इंटरनल मेडिसिन सल्लागार डॉ. पारुल कक्कर यांनी सांगितले की, या हंगामात इतर तापांचे प्रमाण वाढले आहे.

राजेंद्र प्लेस येथील बीएलके हॉस्पिटलमध्येही टायफॉईड आणि इन्फ्लूएन्झाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. ‘दरवर्षी टायफॉईडचे प्रमाण वाढत असते आणि पावसाळ्याच्या अखेरीस हे प्रमाण कमी होते. परंतु या वर्षी तसे झाले नाही’, अशी कबूली इंटरनल मेडिसिन विभागाचे प्रमुख आणि वरिष्ठ संचालक राजिंदरकुमार सिंघल यांनी दिली आहे.

राहणीमानातील बदलांमुळे टायफॉईड-इन्फ्लूएन्झाच्या प्रकरणांत घट

टायफॉईड आणि इन्फ्लूएन्झाच्या प्रकरणांत घट होण्यामागे डॉक्टरांनी दोन महत्त्वाची कारणे सांगितली आहेत. पहिले कारण असे की, कोव्हिड-19 (Corona Virus) साथीच्या रोगामुळे स्वच्छतेत खूप वाढ झाली आहे. तर दुसरे कारण म्हणजे लोक फक्त घरगुती अन्न खात आहेत. डॉ. कक्कर म्हणाल्या की, ‘साथीच्या रोगामुळे आपल्या जीवनशैलीत, अन्न व सामाजिक शिष्टाचारांत बदल झाले आहेत. यातील काही बदल फायद्याचे ठरले, ज्यामुळे यावर्षी टायफॉईड आणि हेपेटायटीसचे प्रमाण कमी झाले आहे’.

संबंधित बातम्या : 

भारतात 10 वर्षांनी BMI चे नियम बदलले, महिला आणि पुरुषांसाठी फिटनेसचं नवं वजन काय?

फिट राहण्यासाठी आता जिममध्ये जाण्याची गरज नाही

(Consistent use of the same mask can cause side effects)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?