AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशक्तपणा दूर करण्यासाठी करा या पौष्टिक लाडूचे सेवन, जाणून घ्या लाडू बनवण्याची पद्धत आणि फायदे

अशक्तपणा येत असल्यामुळे वस्तू घेताना किंवा ठेवताना जर तुमचे हात कापत असतील तर तुम्ही पौष्टिक लाडू घरी बनवू शकता. या लाडूमुळे तुमचा अशक्तपणा कमी होईल. त्यासोबतच तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील हे लाडू फायदेशीर ठरतील.

अशक्तपणा दूर करण्यासाठी करा या पौष्टिक लाडूचे सेवन, जाणून घ्या लाडू बनवण्याची पद्धत आणि फायदे
Ladoo
| Edited By: | Updated on: Jan 03, 2025 | 8:30 PM
Share

हात थरथरण्याची समस्या ही कोणालाही आणि कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकते. चहाचा कप धरताना किंवा कुठलीही दुसरी गोष्ट उचलताना किंवा ठेवतांना अनेक जणांचा हात थरथरायला लागतो. नीट झोप न लागणे, जास्त प्रमाणात कॉफीचे सेवन, मद्यपान, अति थकवा ही यामागची कारणे असू शकतात. याव्यतिरिक्त पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येतो. ज्यामुळे हात थरथरण्याची समस्या उद्भवू शकते. न्यूरोलॉजिकल समस्यांमुळे देखील हात थरथरतात. ज्यामध्ये हात विनाकारण वेगाने हळू लागतात. असे तुमच्या सोबत देखील घडत असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. जर अशक्तपणामुळे तुमचे हात थरथरत असतील तर काही घरगुती गोष्टींचे सेवन केल्याने तुमचा अशक्तपणा दूर होईल. तुम्ही लाडू बनवून त्याचे सेवन केल्यास अशक्तपणा दूर होईल आणि हात थरथरण्याची समस्या कमी होईल.

अशक्तपणा दूर करण्यासाठी पौष्टिकतेने भरपूर गोष्टी खाणे आवश्यक आहे. परंतु दररोज वेगवेगळे पदार्थ खाणे शक्य नाही म्हणून तुम्ही लाडू बनवू शकतात. त्यामुळे तुम्हाला अनेक घटकांचे पोषण सहज मिळेल. हे लाडू कसे बनवायचे ते जाणून घेऊ.

लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • 250 ग्राम फुटाणे
  • दीडशे ग्रॅम बदाम
  • तीन चमचे डिंक
  • 70 ते 80 ग्राम मखाना
  • एक वाटी गावरान तूप
  • एक चमचा हिरवी वेलची पावडर
  • 300 ग्रॅम गूळ

लाडू बनवण्याची कृती

लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम काही बदाम, मखाना आणि फुटाणे मिक्सरमध्ये टाकून बारीक करा. त्यानंतर गॅसवर तवा ठेवा आणि त्यात गावरान तूप टाकून गरम होऊ द्या. आता त्यामध्ये उरलेले बदाम चिरून त्या तळून घ्या यानंतर डिंक तळून घ्या त्यामुळे डिंक फुगेल आणि कुरकुरीत होईल. डिंक फुगल्यानंतर काढा आणि मग मिक्सरमध्ये असलेले फुटाणे आणि बदामाचे मिश्रण तुपात तळून घ्या आणि त्याचा सुगंध येईपर्यंत ढवळत रहा. यानंतर डिंक मिक्सरमध्ये टाकून बारीक करा आणि उर्वरित मिश्रणामध्ये मिक्स करा. यासोबतच तयार मिश्रणामध्ये वेलची पावडर आणि उरलेले बदाम टाका. आता गुळाचे छोटे तुकडे करून कढईत टाका आणि थोडे पाणी घालून गुळ वितळू द्या. गुळ संपूर्ण वितळल्यानंतर तो मिश्रणामध्ये टाका आणि हे मिश्रण एकत्र करून थोडे कोमट झाल्यावर लगेच लाडू बांधून घ्या. मिश्रण थंड झाल्यानंतर लाडू बांधले जाणार नाहीत.

असा खा लाडू

रोज एक ग्लास दुधासोबत एक लाडू खाणे पुरेसे आहे. रोज लाडू खाल्ल्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीरात ऊर्जा जाणवू लागेल. त्या सोबतच सर्दी पासूनही तुमचे संरक्षण होईल. तयार लाडू तुम्ही हवाबंद डब्यात ठेवू शकता. हे लाडू महिनाभर तुम्ही साठवून ठेवू शकता.

Follow Us
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.