रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोज किमान 10 मिनिटे योगासने करा!

कोरोनाच्या काळात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक झाले आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोज किमान 10 मिनिटे योगासने करा!
योगा

मुंबई : कोरोनाच्या काळात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक झाले आहे. त्यामध्येही फक्त हेल्दी आहाराच घेणे महत्वाचे नसून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्यायामामही महत्वाचा आहे. दररोज सकाळी व्यायाम केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते. या व्यतिरिक्त, शरीरातील तणावाची पातळी कमी करण्यासाठी कार्य व्यायाम केल्यामुळे होते. (Do daily yoga to boost the immune system)

काही काळ व्यायाम केल्याने बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. धावणे, पोहणे, व्यायाम करणे आणि वजन उचलणे यासारखे एरोबिक व्यायाम रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर आहेत. ताण आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतो. म्हणून दररोज 10 मिनिटे योगासने करा. असे केल्याने आपल्याला ताणतणाव येणार नाही आणि शरीराची प्रतिकारशक्ती देखील मजबूत होईल.

शरीरात कोर्टीसोलची पातळी उच्च असल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. ताण कमी करण्यासाठी, दररोज 10 मिनिटे ध्यान किंवा योग करा. ताण कमी करण्यासाठी कपालभारती देखील फायदेशीर आहे. कपालभारतीमुळे आपल्या पोटाची हालचाल मोठ्या प्रमाणात होते आणि कपालभारती आपल्या आरोग्यासाठी देखील तेवढेच फायदेशीर आहे. मात्र, कपालभारती करण्याच्या अगोदर तीन तास आपण काहीच खाल्ले पाहिजे नाही. यामुळे शक्यतो सकाळी कपालभारती केलेले कधीही चांगले.

कोरोनामुळे लाॅकडाऊन झाल्यामुळे घराच्या बाहेर पडणे अवघड झाले आहे. त्यामुळे वजन वाढण्याची समस्या निर्माण झाली आहे. यासाठी वजन कमी करण्यासाठी आपल्याला कॅलरीचे प्रमाण नियंत्रित करावे लागेल. दररोज शक्य तितक्या कमी कॅलरी खा. नियमित व्यायाम देखील करा. वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि योग्य आहार हे सर्वात महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी चालणे सर्वात महत्वाचे आहे. दररोज अर्धा तास वेगाने चालल्याने वजन कमी होते. या व्यतिरिक्त आपले चयापचय आणि हृदय गती वाढते.

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

(Do daily yoga to boost the immune system)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI