AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वयंपाकघरात उपलब्ध ‘या’ गोष्टींनी घरच्या घरी अशा पद्धतीने करा फेशियल, चेहरा दिसेल एकदम चमकदार

स्वयंपाकघरातील काही गोष्टींचा वापर करून तुम्ही घरच्या घरी 10 ते 15 मिनिटांत नैसर्गिक फेशियल करू शकता, ज्यामुळे चेहरा चमकदार दिसेल. चला तर मग आजच्या लेखात आपण घरी फेशियल करण्याचे 5 सोपे टिप्स जाणून घेऊयात.

स्वयंपाकघरात उपलब्ध 'या' गोष्टींनी घरच्या घरी अशा पद्धतीने करा फेशियल, चेहरा दिसेल एकदम चमकदार
अशी करा नैसर्गिक पद्धतीने फेशियल Image Credit source: टीव्ही 9 मराठी I
| Edited By: | Updated on: May 16, 2026 | 11:15 AM
Share

रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक महिलांना स्वत:कडे लक्ष द्याला वेळ मिळत नाही. तसेच सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी महिलांना सतत पार्लरमध्ये जाऊन फेशियल करायला वेळ मिळत नाही. अशावेळी अनेक महिला या घरगूती उपाय करण्याला अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे स्वयंपाकघरात असलेल्या या गोष्टींचा वापर करून अगदी सहज सोप्या पद्धतीने फेशियल करता येते. कारण घरगुती आणि नैसर्गिक पद्धतीने केलेले फेशियल त्वचेचे आतून सौंदर्य वाढवतात, याशिवाय खराब झालेली त्वचेची गुणवत्ता आणि रंग सुधारण्यासाठी मदत होते. चला तर मग आजच्या लेखात आपण स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या गोष्टींनी घरच्या घरी फेशियल करण्याचे सोपी पद्धत जाणून घेऊयात.

घरी फेशियल करण्याचे सोपे मार्ग

1.क्लींजिंग-

फेशियलची सुरुवात नेहमी चेहरा स्वच्छ करण्याने होते. यासाठी कच्च्या दुधाचा वापर करा. कापसाचा बोळा घेऊन दुधात भिजवून संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमची त्वचा खोलवर स्वच्छ होईल आणि सर्व घाण व मळ निघून जाईल.

2. डेड स्किन

मृत त्वचेच्या पेशी हे चेहऱ्यावरील चमक कमी होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. त्या काढून टाकण्यासाठी अर्धा चमचा साखर आणि थोडे मध एकत्र मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून 2-3 मिनिटे हळुवारपणे मसाज करा. साखर स्क्रबचे काम करेल आणि मध तुमची त्वचा मऊ करेल.

3. चेहऱ्याचा मसाज

मसाजसाठी तुम्ही त्वचेवर कोरफडीचा गर किंवा पपईचा गर वापरू शकता. यापैकी कोणताही गर चेहऱ्यावर लावा आणि 5 मिनिटे वरच्या दिशेने हलक्या हाताने मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण वाढेल आणि तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक गुलाबी चमक येईल.

4. फेस पॅक

शेवटी एक उत्तम फेस पॅक लावा. एका वाटीत बेसन, चिमूटभर हळद आणि दही एकत्र करून पेस्ट बनवा. ती चेहऱ्यावर 15 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.

अशा प्रकारे नैसर्गिक गोष्टींचा वापर करून तुम्ही घरच्या घरी फेशियल केल्याने नैसर्गिकरित्या त्वचेला चमक मिळते. तसेच घरगूती उपाय केल्याने त्वचेवर याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. अशातच ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी हे उपाय करताना पॅच टेस्ट करावा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा