AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Highlight : रंग हे नवेनवे.. ! केस हायलाईट करायची आहे इच्छा? पण त्यापूर्वी या गोष्टी तर जाणून घ्या

Highlighting Hair : केस हायलाइट करण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार करावा, तसेच कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते जाणून घेऊया.

Hair Highlight : रंग हे नवेनवे.. ! केस हायलाईट करायची आहे इच्छा? पण त्यापूर्वी या गोष्टी तर जाणून घ्या
Image Credit source: freepik
| Updated on: Apr 03, 2023 | 8:29 AM
Share

नवी दिल्ली : आजकाल अनेक तरूण-तरूणींमध्ये आपले केस हायलाइट (hair highlights) करणे हा लोकप्रिय फॅशन ट्रेंड बनला आहे. स्वत:चा लूक चेंज करण्यासाठी किंवा अधिक स्टायलिश (stylish looks) दिसण्यासाठी अनेक महिला आणि पुरुषांनी हा नवीन फॅशन ट्रेंड फॉलो केला आहे. हेअर हायलाइटिंगमध्ये केसांना वेगवेगळे रंग (hair colors) लावले जातात, ज्यामुळे तुमची पर्सनॅलिटी चेंज होते आणि तुमचा लूकही थोडा वेगळा होतो. केस हायलाइट केल्याने केसांचा पोत तर बदलतोच, पण ते चमकदार होण्यासही मदत होते.

पण केस हायलाइट करण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार करणे महत्वाचे आहे. हेअर कलर करताना किंवा केल्यानंतर त्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

तुमच्या स्किन टोननुसार केसांसाठी कोणता रंग निवडावा, तसेच किती केस हायलाइट करायचे इत्यादी गोष्टींकडे नीट लक्ष देऊन , त्याची माहिती घेऊन मगच हायलाईट करण्याचा पर्याय निवडावा. केसांना हायलाइट करण्याआधी व ते कलर केल्यानंतर कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि काय करावे आणि काय करू नये हेही जाणून घेऊया.

काय करावे ?

1) केस हायलाइट करण्याआधी, तुमच्या केसांना कोणता रंग सूट होईल हे तुम्ही आधी ठरवले पाहिजे. हायलाइट्ससाठी रंग निवडताना स्किन टोन, केसांचा नैसर्गिक रंग आणि कोणता ऋतू आहे, या सर्व गोष्टी लक्षात घ्याव्यात. छान लूक मिळण्यासाठी बेज आणि ब्राऊन रंग निवडता येतो. लक्षात ठेवा की रंग नेहमी त्वचेच्या टोननुसार असावा. जर तुम्ही उन्हाळ्यात हायलाइट करत असाल तर हलका रंग निवडा आणि हिवाळ्यात हायलाइट करत असाल तर गडद किंवा डार्क रंग निवडा.

2) आपले केस हे प्रत्येकासाठी महत्वाचे असतात, त्यामुळे त्यांची नीट काळजी घेणेही खूप महत्वाचे आहे. केसांचा प्रश्न असल्याने, नेहमी व्यावसायिक हेअर कलरिस्टकडून केस हायलाइट करून घ्या. कारण लोक स्टायलिस्ट किंवा कलरिस्टकडून केस हायलाइट करणे महागात पडू शकते. एखादा प्रोफेशनल हेअर स्टायलिस्ट हा चांगली व योग्य उत्पादने वापरेल आणि तुम्हाला सर्वोत्तम परिणाम देईल. तुम्हाला कोणता रंग शोभेल हे ठरविण्यातही तो तुमची मदत करू शकतो.

3) केस हायलाइट केल्यानंतर, चांगला व उत्तम दर्जाचा शांपू आणि कंडिशनर वापरा. कारण त्यांच्या मदतीने हायलाइट्स दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास खूप मदत होईल. तसेच केसांचेही नुकसान होणार नाही.

काय करणे टाळावे ?

1) हीटिंग टूल्स वापरणे टाळावे : केस हायलाईट केल्यानंतर केसांसाठी स्ट्रेटनर्स, रोलर्स यांसारखी हीटिंग किंवा गरम करणारी उपकरणे वापरणे टाळा. कारण ते तुमच्या केसांना हानी पोहोचवू शकतात.

2) गरम पाणी आणि सल्फेट प्रॉडक्ट्स वापरू नका : केस हायलाईट केल्यानंतर केसांसाठी सल्फेट फ्री शॅम्पू वापरा आणि खूप गरम पाण्याने आंघोळ टाळा. कारण त्यामुळे केसांची छिद्र ओपन होऊ शकतात, ज्यामुळे केसांचा रंग फिका होऊ शकतो.

3) एकापेक्षा जास्त रंग वापरून केस हायलाईट करणे टाळावे : तुमचे केस 2 पेक्षा जास्त रंगांनी हायलाइट करू नका. अनेक रंगांमुळे तुमचे केस वेगवेगळ्या प्रकारच्या रसायनांच्या संपर्कात येऊ शकतात, ज्यामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.