AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yoga for Diabetes : मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी ‘हे’ योगासने करा !

देशात मधुमेह असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतातील सुमारे 5 कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत.

Yoga for Diabetes : मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी 'हे' योगासने करा !
योगा
| Edited By: Anish Bendre | Updated on: May 31, 2021 | 8:30 AM
Share

मुंबई : देशात मधुमेह असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतातील सुमारे 5 कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. बर्‍याच तज्ञांचे मत आहे की नियमित योगाभ्यास केल्यास मधुमेह नियंत्रणात राहतो. योगा केल्याने रक्त परिसंचरण चांगले आहे. वजन वाढणे, ताणतणाव आणि उच्च रक्तदाब यासारख्या मधुमेहामुळे होणार्‍या समस्या कमी करण्यास योगा करणे फायदेशीर आहे. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही हे तीन योगसन तुम्ही करू शकता. (Do yoga to control diabetes)

धनुरासन

पाठदुखीच्या समस्येवर धनुरासन अतिशय फायदेकारक ठरते. या आसनामुळे पाठदुखीची समस्या कमी होते. विशेष म्हणजे धनुरासन केल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळते. धनुरासन करण्यासाठी आधी उपडी होऊन ताठ झोपावे. दोन्ही हात आणि पाय सरळ रेषेत ताणावे. मग दोन्ही पाय उलट्या दिशेने वर उचलून दोन्ही हातांनी ताणून धरा. यादरम्यान शरीरावर थोडा ताण देऊन, शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे करा. धनुष्याप्रमाणे शरीर ताणले जात असल्यानेच या आसनाला धनुरासन म्हणतात. 10 मिनिटे या आसनमुद्रेत राहण्याचा प्रयत्न करा. हर्निया, अल्सर आणि हृदयरोग असलेल्या लोकांना हे आसन करु नये.

चक्रासन

हे आसन करण्यासाठी आपल्या पाठीवर अगोदर झोपावे लागेल. त्यानंतर दोन्ही हात आणि पाय जमिनीवर ठेवा आणि आपले संपूर्ण शरीर पाय आणि हाताच्या आधारे उचला. यामुळे अर्धा गोलाकार तयार होईल. हे आसन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. हे आसन केल्यावर पाठ, कंबर, पोट, हात आणि पायांवर थोडा ताण येतो. साधारण वीस मिनिटे हे आसन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. आसनादरम्यान कोणत्याच प्रकारची हालचाल करायला नको. विशेष टिप म्हणजे हे आसन करताना कोणालाही बोलणे टाळा. हे आज केल्याने दोन प्रमुख फायदे होतात. एक म्हणजे मधुमेह नियंत्राणात राहतो. दुसरे म्हणजे आपले वजन देखील कमी होते.

मत्स्यासन

सध्याच्या कोरोना काळात मत्स्यासन करणे खूप फायदेशीर आहे. मत्स्यासन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. मत्स्यासन एक फिश पोझ आहे जी शरीराला डिटॉक्स करते. तसेच यामुळे ऊर्जा वाढवते. आपण कोरोना संसर्गातून बरे होत असल्यास आपण हे आसन करू शकता. मत्स्यासन करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला जमिनावर झोपावे लागेल. त्यानंतर पायाची मांडी घाला आणि पायाचे दोन्ही पंजे हाताने पकडा. त्यानंतर पाठ वरती उचलण्यासाठी प्रयत्न करा. हे आसन साधारण वीस मिनिटे टिकवण्याचा प्रयत्न करा. आसन स्थिती स्थिर ठेवा. हे आसन आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप महत्वाचे आहे. हे आसन आपण दररोज केले पाहिजे.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Do yoga to control diabetes)

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ