AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Immunity Booster : ओवा, मिरपूड, तुळशीचे खास पेय प्या आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा !

जर आपल्याला कोरोनापासून दूर राहिचे असेल आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे खूप आवश्यक आहे.

Immunity Booster : ओवा, मिरपूड, तुळशीचे खास पेय प्या आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा !
| Edited By: Anish Bendre | Updated on: May 12, 2021 | 10:00 AM
Share

मुंबई : जर आपल्याला कोरोनापासून दूर राहिचे असेल आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे खूप आवश्यक आहे. कोरोना काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी मजबूत ठेवता येईल. यासाठी सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ओवा, मिरपूड आणि तुळश अत्यंत फायदेशीर आहे. ओव्यामध्ये अनेक औषधी गुण असतात. हे बर्‍याच रोगांच्या उपचारांमध्ये वापरले जाते. (Drink Ajwain, black pepper, basil and boost the immune system)

एका पॅनमध्ये 1 ग्लास पाणी, ओवा, काळीमिरी आणि तुळशीची पाने घाला आणि 5 मिनिटे उकळवा. उकळल्यानंतर हे पाणी थोडा वेळ ठेवा. हलके कोमट असताना यात मध मिसळा आणि ते प्या. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल आणि इतर बर्‍याच समस्यांपासून मुक्त होता येईल. या व्यतिरिक्त, पाचक प्रणालीसाठी देखील हे खूप फायदेशीर आहे. अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या बऱ्या करण्यासाठी तुळस उपयुक्त ठरते. आयुर्वेदात औषध म्हणून तुळश वापरली जाते.

ओव्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, कॅरोटीन असते. शिवाय यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्सदेखील काही प्रमाणात आढळतात. ओव्यामधील थायमॉल या जंतूनाशक घटकांमुळे वातावरण शुद्ध होते. त्यामुळे ओव्याचा नैसर्गिक औषध म्हणून देखील वापर केला जातो. भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये अनेक पदार्थांमध्ये ओवा आवर्जून वापरला जातो. कारण त्यामुळे पदार्थ रुचकर होतात आणि पाचनही सुरळीत राहते.

जर तुमच्या पोटात दुखत असेल तर ओवा तुमच्यासाठी रामबाण उपाय आहे. गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता झाल्यास काळी मिठ मिसळून ओवा खावा. काळी मिरी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी काळी मिरी फायदेशीर आहे. काळी मिरी एक शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट आहे. ज्यामुळे सर्दी आणि खोकला कमी होण्यास मदत होते. कफ प्रकृतीसाठी काळी मिरी खूप फायदेशीर मानली जाते.

काळी मिरीत लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त, क्रोमियम, व्हिटामिन ए आणि इतर पोषक गुणधर्म आढळतात. याशिवाय यामध्ये रायबोफ्लेविन, थायामिन, पोटॅशियम, सोडियम, फॉलेट, बेटेन आणि नियासिन हे घटकदेखील आढळतात. अपचनाची समस्या निर्माण होत असेल तर, लिंबाचा अर्धा तुकडा घेऊन त्यातील बिया काढून टाका. त्यात काळे मीठ आणि मिरपूड भरून गरम करा आणि चोखा. याने अपचनाची समस्या दूर होईल.

संबंधित बातम्या : 

(Drink Ajwain, black pepper, basil and boost the immune system)

Follow Us
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद, VIDEO व्हायरल
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने..
Pune Case : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने रद्द!