कारले आणि बीटचा रस प्या आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती !

सध्याच्या कोरोना काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे खूप आवश्यक झाले आहे.

कारले आणि बीटचा रस प्या आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती !
कारले आणि बीट ज्यूस

मुंबई : सध्याच्या कोरोना काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे खूप आवश्यक झाले आहे. कारण जर आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर आपण कोरोनासारख्या आजारापासून दूर राहू शकतो. देशामध्ये सध्या कोरोनाची दूसरी लाट आली असून कोरोनाचा संसर्ग हा वाढतच चालेला आहे. आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी एक खास पेय सांगणार आहोत. हे पेय पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होईल. (Drink caraway and beet juice and boost the immune system)

बीट शरीरातील हिमोग्लोबिन वाढवतात आणि रक्त शुद्ध करतात. त्यात आढळणारे अँटिऑक्सिडेंटस शरीराला रोगांशी प्रतिकार करण्याची क्षमता देतात. याबरोबरच नायट्रेट, बेटेन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम, व्हिटामिन बी 1, बी 2 आणि सी हे तत्व बीटाचे औषधी गुणधर्म वाढवतात. शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढत असेल तर आपण बीटच्या रसाचे सेवन करू शकता. यासाठी ते खूप फायदेशीर आहेत. बीटमध्ये मिनरल सिलिका असते.

या तत्त्वामुळे शरीर कॅल्शियमला प्रभावी रुपात वापरता येऊ शकते. कॅल्शियम आपल्या दात आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. कारली खायला कडू असतील तरी देखील ती आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. कारल्यामध्ये भरपूर प्रमाणात अ, ए, सी, ई, के जीवनसत्वे असतात. कारले आणि बीटचा रस तयार करण्यासाठी अर्धे कारले आणि एक बीट घ्या. त्यामध्ये लिंबू देखील मिक्स करा. कारले आणि बीटचा रस तयार करताना त्यामध्ये थोडे पाणी घाला.

हा रस दररोज सकाळी पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. सध्याच्या कोरोना काळात तर हा रस आपण दररोज सकाळी पिला पाहिजे. बीटमध्ये मिनरल सिलिका असते. या तत्त्वामुळे शरीर कॅल्शियमला प्रभावी रुपात वापरता येऊ शकते. कॅल्शियम आपल्या दात आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते. यामुळे दिवसातुन दोन वेळा बीटचे ज्युस प्यायल्याने आस्टिओपरोसिस आणि हाडे व दातांच्या दुसऱ्या समस्या होणार नाही. बीट नायट्रेट्सचा एक चांगला स्रोत आहे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

High Blood Pressure | केवळ मीठच नव्हे, उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी चुकनही खाऊ नयेत ‘या’ गोष्टी!

(Drink Bitter melon and beet juice and boost the immune system)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI