दररोज सकाळी प्या ‘हे’ प्रोटीन शेक आणि राहा निरोगी !

दररोज सकाळी प्या 'हे' प्रोटीन शेक आणि राहा निरोगी !
शेक

जेव्हा निरोगी आरोग्याचा विचार केला जातो, तेव्हा आपले प्रथम लक्ष आहारावर असते. आहारात पौष्टिक पदार्थ घेतल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jun 07, 2021 | 4:41 PM

मुंबई : जेव्हा निरोगी आरोग्याचा विचार केला जातो, तेव्हा आपले प्रथम लक्ष आहारावर असते. आहारात पौष्टिक पदार्थ घेतल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. परंतु, कदाचित आपल्याला हे माहितच नसेल की खाण्यापेक्षा जास्त हेल्दी द्रव पदार्थ पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आपण दररोज सकाळी चहा-कॉफीऐवजी प्रोटीन शेक पिऊ शकतो. (Drink this protein shake every morning and stay healthy)

-आकारानं छोट्या असलेल्या या सुकामेव्याचे शरीराला होणारे फायदे आश्चर्यकारक आहेत. बदामामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि ओमेगा ३ हे घटक आहेत. बदामामध्ये प्रथिने, अँटी-ऑक्सिडंट्सही असतात. शिवाय कॅलरीचं प्रमाण कमी असतं. यामुळे सध्याच्या कोरोनाच्या काळात आपण आहारात बदाम शेकचा समावेश केला पाहिजे.

-केळीमध्ये 100 कॅलरी उर्जा असते, ज्यामुळे तुमचे शरीर दिवसभर सफुर्तीवान राहते. या व्यतिरिक्त, त्यात असलेले इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे देखील शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. केळ्यात अँटीऑक्सिडंट्स, पाण्याचे आणि फायबरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते.  केळी शेक घेणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप चांगले आहे.

-जर आपण चहा किंवा कॉफीमध्ये जास्त साखर घेत असाल, तर तुम्ही स्वतःहून आजारांना निमंत्रण देत आहात. या पेयांच्या अति सेवनाने लठ्ठपणा आणि टाईप 2 मधुमेहाचा धोका वाढतो. चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन जास्त असते, जे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.

-शरीराचे निर्जलीकरण अर्थात डीहायड्रेशन होण्यापासून वाचण्यासाठी पुरेसे पाणी प्या. तसेच, अनहेल्दी ड्रिंक्सऐवजी नैसर्गिक आरोग्यदायी पेय प्या. यासाठी आपण ताज्या फळांचा रस आणि नारळ पाणी पिऊ शकता. गरम पेय आवडत असल्यास चहा किंवा कॉफीऐवजी हळदीचे दूध प्या.

-गाजरात 95 टक्के पाण्याचे प्रमाण असते. ज्यामुळे गाजर खाण्यामुळे तुम्ही हायड्रेट राहता. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी बीट आणि गाजरचा रस घेणे खूप चांगले आहे. बीटमध्ये कॅरोटीन आणि अल्फा यासारखे पौष्टिक पदार्थ असतात. ते आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. बीट आणि गाजरचा रस बनवा आणि त्यात थोडासा लिंबाचा रस मिसळा आणि प्या.

संबंधित बातम्या : 

सावधान! रक्तदाब-जळजळ-उष्णता, काढ्याच्या अति सेवनाने होतील आरोग्यावर दुष्परिणाम!

Hair Care | केस गळती, कोंड्याची समस्या? सगळ्यांवर रामबाण उपाय ठरेल बहुगुणकरी ‘रीठा’!

(Drink this protein shake every morning and stay healthy)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें