AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tips for Darker Mehndi: मेहंदीचा रंग जास्त गडद होण्यासाठी करून पहा हे उपाय

लहान मुलगी असो व मोठ्या स्त्रिया , सर्वांनाच मेहंदी काढायला खूप आवडते. हाता-पायावर काढण्यात आलेली मेहंदी खूप रंगली की तिचा रंग अजून खुलून दिसतो. त्यासाठी मेंहदीचे हात काही काळ पाण्यापासून लांब ठेवा.

Tips for Darker Mehndi: मेहंदीचा रंग जास्त गडद होण्यासाठी करून पहा हे उपाय
मेहंदीचा रंग जास्त गडद होण्यासाठी करून पहा हे उपायImage Credit source: fabbon
| Updated on: Jul 30, 2022 | 12:20 PM
Share

लहान मुलगी असो व मोठ्या स्त्रिया , सर्वांनाच मेहंदी (Mehndi) लावणे खूप आवडतं. भारतात आणि परदेशातही मोठ्या प्रमाणात स्त्रिया मेहंदी लावतात. स्त्रियांच्या सौंदर्यप्रसाधनातील तो एक महत्वाचा घटक आहे. कोणताही सण असो वा समारंभ (festivals) स्त्रियांच्या हातावर मेहंदी काढलेली दिसते. कोणाला हातभर, मोठी भारतीय पद्धतीने काढलेली मेहंदी आवडते तर कोणाला छोटीशी अरेबिक. पण मेहंदी हा सर्व स्त्रीवर्गाचा वीक-पॉईंट असे म्हणायला हरकत नाही. आजकाल बाजारात अनेक प्रकारची मेहंदी उपलब्ध दिसते, ती अगदी थोडा वेळ जरी हातावर लावून ठेवली तरी छान , गडद रंग येतो. पण पारंपारिक पद्धतीने, मेहंदीची पान वाटून जो मेंहदीचा कोन तयार करण्यात येतो, त्याची मजा आणि सुवास काही औरच असतो. टॅटू वाल्या मेहंदीमध्ये तेवढी मजा येत नाही. मेंहदी जेवढी गडद होते, तेवढाच त्याचा रंग खुलून दिसतो. पण काहींच्या हातावरील मेहंदीचा रंग जास्त चढत नाही. खालीलपैकी काही टिप्स फॉलो केल्या तर मेहंदीचा रंग गडद ( tips to get natural dark color of Mehndi) तर होईलच पण ती खुलूनही दिसेल.

सुंदर मेहंदीचा रंग गडद होण्यासाठी काही टिप्स –

  1. – मेंहदी काढण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्या. त्यावर कोणतेही लोशन अथवा क्रीम लावलेले नसावे. अन्यथा गडद रंग चढू शकणार नाही.
  2. – मेहंदी काढून झाल्यानंतर ती थोडा वेळ नीट वाळू द्या आणि निदान काही तास तरी हात पाण्यापासून लांब ठेवा.
  3. – मेहंदी लावल्यानंतर त्यावर लिंबू रस व साखर यांचे मिश्रण कापसाने हलक्या हाताने लावा. त्यामुळे मेहंदी हातावर जास्त वेळ टिकून राहते, तिचे कण इकडे-तिकडे पडतही नाहीत.
  4. – काही ठिकाणी मेहदी लावल्यानंतर त्यावर घरातील लोणच्याचे, मोहरीचे तेल लावतात.
  5. – गॅसवर तवा ठेवून त्यावर चार- पाच लवंगांचे तुकडे परतून चांगले गरम होऊ द्यावे. हाता मेहंदी लावलेला हात त्या तव्यावरून फिरवत, लवंगांच्या धुराचा नीट शेक घ्या. त्यामुळे मेहंदीचा रंग आणखी गडद होण्यास मदत होते.
  6. – मेहंदी वाळल्यानंतर त्यावर चुना रगडून लावल्यासही रंग चांगला चढतो, असे म्हणतात.
  7. – कापसाच्या मदतीने वाळलेल्या मेहंदीवर मोहरीचे तेल अथवा पेपरमिंट ऑईल लावावे.
  8. – व्हिक्स किंवा आयोडेक्स सारखे बामही गरम असतात, ते मेहंदी काढलेल्या हातावर लावल्यास त्यांच्या उष्णतेमुळेही मेंहदी चांगली रंगते. मात्र हे बाम लावण्यापूर्वी काळजी घ्यावी, काही व्यक्तींना त्यामुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे आधी नीट तपासणी करावी. जर काही त्रास होत नसेल तरच हे बाम लावावे.
  9. – मेहंदी वाळल्यानंतर ती धुण्यापूर्वी तेल लावून ठेवावे व हाताने नीट चोळून काढावी. मेहंदी धुण्यासाठी पाण्याचा वापर शक्यतो कमी करावा.
  10. – मेंहदीचा रंग जास्त काळ गडद रहायला हवा असेल तर निदान 1-2 दिवस तरी मेंहदीचे हात पाण्यापासून दूर ठेवावे. मेंहदीच्या हातांना पाण्याचा कमीत कमी स्पर्श व्हावा, तर तिचा रंग जास्त काळ टिकतो.

( टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व दिलेले सल्ले हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत.)

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.