AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दही खाल्ल्याने पित्ताचा त्रास होतोय? मग ‘या’ टिप्स नक्की फाॅलो करा !

बऱ्याच लोकांना दही खायला आवडते. मात्र, त्यांना पित्ताचा त्रास होत असल्यामुळे दही इच्छा असताना देखील खाता येत नाही.

दही खाल्ल्याने पित्ताचा त्रास होतोय? मग 'या' टिप्स नक्की फाॅलो करा !
दही
| Edited By: | Updated on: May 31, 2021 | 9:00 AM
Share

मुंबई : बऱ्याच लोकांना दही खायला आवडते. मात्र, पित्ताचा त्रास होत असल्यामुळे दही इच्छा असताना देखील खाता येत नाही. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही दही खाऊ शकता आणि पित्ताचा त्रास देखील होणार नाही. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन बी 12 सारखी पोषक तत्वांचा फायदा होतो.  (Eat Curd in your diet to get rid of bile)

ज्या लोकांना पित्ताचा त्रास होतो त्यांनी दह्यामध्ये तूप, साखर, मुगाची भिजवलेली डाळ, मध किंवा आवळा घालून खावे. यामुळे त्यांना पित्ताचा त्रास होणार नाही. आंबट व अत्यंत आंबट दहीसुद्धा सेवन करू नये. यामुळे पित्ताचे व अपचनाचे विकार मागे लागतात. म्हणजेच फक्त गोड व आंबट-गोड दही आपण खाऊ शकतो. जे दही लागले आहे, जे मधुर रसदार व थोडे आंबट असते त्याला गोड दही असे म्हणतात. हे दही सर्वात उत्तम समजले जाते.

हे शक्तिवर्धक असून यामुळे पचनशक्तीसुद्धा सुधारते, भूक वाढते. मात्र, मधुमेह झालेल्या व्यक्तीने कोणत्याच प्रकारचे दही सेवन करू नये. दही तयार करण्यासाठी नेहमी ‘फुल क्रीम’ दुधाचा वापर करा. दही लावण्यासाठी दूध मातीच्या जाड मटका किंवा हांडीमध्ये साठवा. कारण, या भांड्यात उष्णता जास्त काळ राहते. भांड्यात टाकण्यापूर्वी प्रथम ते दूध चांगले उकळवा. पुन्हा थंड होऊ द्या. दूध कोमट झाल्यावर त्यात थोडे ताजे दही घाला. यासाठी साधारण एक लिटर दुधात एक चमचा दही टाकू शकता.

या मिश्रणाला व्यवस्थित फेटून घ्या. यानंतर, हांडी अशा ठिकाणी ठेवा जिथे ती जास्त वेळ गरम राहील. यासाठी आपण गरम चपात्या बनवण्याच्या ठिकाणी, किंवा जेवण बनवण्याच्या ठिकाणी ठेवू शकता. हे भांडे लोकरीच्या कपड्यात गुंडाळून पिठाच्या डब्यात किंवा कुकरच्या भांड्यामध्ये देखील ठेवू शकता. दही हा एक उत्तम प्रोबायोटिक पदार्थ आहे. त्यामध्ये असलेले सूक्ष्मजीव आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. दही अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करते.

दह्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. याव्यतिरिक्त झोपेची समस्या दूर करण्यातही दही फायदेशीर आहे. केसांवर आणि त्वचेवर दही लावल्याने त्याचे चांगले परिणाम दिसू लागतात. डोक्यातील कोंडा टाळण्यासाठी केसांना दही लावणे फायदेशीर ठरते. यासाठी केसांना दही लावून अर्ध्या तासाने केस धुवावे. दहीमध्ये लैक्टोज असते. यामुळे तुमची पाचकशक्ती वाढते. ज्यांचे पचन तंत्र कमकुवत आहे अशा लोकांसाठी ते फायदेशीर आहे.

(टीप : सदर लेख संशोधनावर आधारित असून, कुठल्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

(Eat Curd in your diet to get rid of bile)

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.