AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Healthy Diet | डाएटमध्ये करा हिरव्या भाज्यांचा समावेश, होतील अनेक फायदे!

वजन कमी करण्यासाठी सुमारे 60 ते 70 टक्के वाटा हा योग्य आहाराचा असतो, तर उर्वरित 30 ते 40 टक्के वाटा हा व्यायामाचा असतो.

Healthy Diet | डाएटमध्ये करा हिरव्या भाज्यांचा समावेश, होतील अनेक फायदे!
हिरव्या भाज्या
| Edited By: | Updated on: Apr 02, 2021 | 11:06 AM
Share

मुंबई : वजन कमी करण्यासाठी सुमारे 60 ते 70 टक्के वाटा हा योग्य आहाराचा असतो, तर उर्वरित 30 ते 40 टक्के वाटा हा व्यायामाचा असतो. म्हणजेच तंदुरुस्त राहण्यासाठी आहार आणि व्यायाम या दोन्हीचे संयोजन आवश्यक आहे. परंतु, आजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे स्वत:साठी वेळ मिळवणे खूप अवघड बनले आहे आणि डाएट करायचे ठरवले तरी, त्यामध्ये काय खाल्ले पाहिजे आणि काय नाही हेच अनेक जणांना समजत नाही किंवा त्यामध्ये दुमत असते (Eat green vegetables in diet is beneficial for health)

वजन कमी करण्यासाठी तसंच आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश आवर्जून करावा. वजन नियंत्रणात आणण्यासाठी भाज्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. हिरव्या भाज्यांच्या सेवनामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो आणि शरीरातील कॅलरीज् देखील कमी होतात. आपल्या दिवसाची सुरुवात कोमट पाणी पिऊन करा. यानंतर ब्रेकफास्टमध्ये दूध, ग्रीन टी किंवा चहा घ्या. परंतु, केवळ चहा न पिता त्यासोबत उपमा, ओट्स, व्हेजिटेबल दलिया, ब्राऊन ब्रेड, ब्राऊन ब्रेडने असा एखादा पौष्टिक पदार्थ खा.

असा असावा हेल्दी आहार :

-सकाळचा नाश्ता ते दुपारच्या जेवणादरम्यान फळं, नारळाचे पाणी, रस, ताक असे काहीतरी सेवन करा.

-दुपारच्या जेवणात प्रथम सलाड खा. त्यानंतर डाळ, 2 विनातेल चपात्या आणि हिरव्या भाज्या खा. चपाती बार्ली, हरभरा आणि गव्हाचे पीठ यांच्या मिश्रणाची असावी. चपातीसाठी मका, गहू, बाजरी हे त्या-त्या हंगामाप्रमाणे बदला.

-दुपारच्या जेवणानंतर चहा किंवा ग्रीन टी सोबत संध्याकाळच्या नाश्त्यात भाजलेले चणे, ढोकळा, डोसा यापैकी एखादा पदार्थ खा.

-रात्रीचे जेवण हलके असावे. त्यात हिरव्या भाज्या आणि चपाती यांचा समावेश करा. ओल्या भाज्या आणि हिरव्या पालेभाज्या घ्या, पण रात्रीच्या जेवणात केवळ एकच चपाती खा. किंवा याला पर्याय म्हणून आपण व्हेजिटेबल दलिया, व्हेजिटेबल ओट्स, कच्चा पनीर इत्यादी पदार्थ देखील खाऊ शकता.

(टीप : आहारबदलापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

(Eat green vegetables in diet is beneficial for health)

हेही वाचा :

रिकाम्या पोटी ‘चहा’ पिणे आरोग्यासाठी हानिकारक !

लांबसडक केसांसाठी घरच्या घरी तयार करा ‘हा’ हेअर मास्क !

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.