Health Tips | मासिक पाळीच्या वेदनेत आराम मिळवून देतील ‘हे’ पदार्थ! अशा प्रकारे करा सेवन

मासिक पाळी हा महिलांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असतो. प्रत्येक महिन्यात त्यांना याला सामोरे जावे लागते. मासिक पाळी दरम्यान महिलांना पोटदुखी, चिडचिडेपणा, डोकेदुखी इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागते.

Health Tips | मासिक पाळीच्या वेदनेत आराम मिळवून देतील ‘हे’ पदार्थ! अशा प्रकारे करा सेवन
मासिक पाळीच्या वेदना
Follow us
| Updated on: Apr 08, 2021 | 2:02 PM

मुंबई : मासिक पाळी हा महिलांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असतो. प्रत्येक महिन्यात त्यांना याला सामोरे जावे लागते. मासिक पाळी दरम्यान महिलांना पोटदुखी, चिडचिडेपणा, डोकेदुखी इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागते. महिलांना पीरियड्स दरम्यान सामान्य वेदना या होतातच. परंतु, काही स्त्रियांना या दरम्यान तीव्र वेदना आणि पेटके जाणवतात. या काळातील वेदनांचा त्यांचा कामावर आणि दैनंदिन जीवनावरही परिणाम होतो (Eat these food to decrease period pain).

अनेक स्त्रिया मासिक पाळी दरम्यान कोणत्याही प्रकारचे औषध घेत नाहीत. त्याऐवजी, घरगुती उपचार करणे आणि पोटाला पाण्याने शेक देण्यास प्राधान्य देतात. जर, आपल्यालाही पीरियड्स दरम्यान तीव्र वेदना होत असतील, तर आम्ही आज तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही या दरम्यान खाऊ शकता आणि लवकरच या वेदनातून मुक्त होऊ शकता.

जास्त पाणी प्या!

पाणी पिण्यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहते. पोटात पेटके येण्यापासून आराम मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे शक्य तितके पाणी पिणे. याशिवाय चहा किंवा कॉफीचे सेवन देखील या दरम्यान फायदेशीर ठरते.

हिरव्या भाज्या खा.

रक्ताअभावी शरीरात लोहाचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे आपल्याला सुस्त वाटते. या दरम्यान केळी, हिरव्या पालेभाज्या आणि पालक भरपूर प्रमाणात खा. या गोष्टींमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे असतात. या गोष्टी लोहाचे मुख्य स्त्रोत आहेत.

अॅवाकाडो आणि भोपळ्याच्या बिया

या काळात थोड्या-थोड्या अंतराने मॅग्नेशियमयुक्त पदार्थ खावेत. यासाठी आपण आहारात अॅवाकाडो, भोपळा बियाणे आणि शिजवलेले सोयाबीनचे पदार्थ खाऊ शकता. या गोष्टी खाल्ल्याने पोटदुखी आणि डोकेदुखी दूर होते (Eat these food to decrease period pain).

डार्क चॉकलेट

जरी आपल्याला डार्क चॉकलेटची चव आवडत नसली, तरी हे मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोहाने समृद्ध आहे. यामुळे स्नायूंना आराम देण्यास मदत मिळते. तसेच वेदना कमी होतात. यात सेरोटोनिन नावाचे रसायन असते, जे तुम्हाला पीरियड दरम्यान शांत राहण्यास मदत करते.

दालचिनी

वेदना आणि सूज कमी करण्यासाठी दालचिनी जेवणात किंवा सॅलडमध्ये वापरली जाऊ शकतात. यासाठी आपण एका ग्लास कोमट दुधात दालचिनी मिसळळून प्यायल्यास त्याचा आणखी फायदा मिळेल.

आले आणि बडीशेप

अन्न खाल्ल्यानंतर बडीशेप चघळण्यामुळे पाचन सुधारते, तसेच यातील प्रोस्टाग्लॅंडीन वेदना कमी करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त, आले देखील फायदेशीर आहे कारण त्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे मासिक पाळीतील वेदना कमी करण्यास मदत करतात.

(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Eat these food to decrease period pain)

हेही वाचा :

कोरोना काळात कामी येतील ‘या’ आयुर्वेदिक टिप्स, वाचा याचे महत्त्वपूर्ण फायदे…

ओठांच्या रुक्षपणामुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ उपाय ट्राय करा…

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.