AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डाळिंब आणि बदामसोबत खा आणि वजन कमी करा, वाचा याबद्दल अधिक !

जर आपले वजन वाढत असेल तर ताबडतोब आपल्या आहारावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात करा. एकदा जर वजन वेगाने वाढले तर पुन्हा वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.

डाळिंब आणि बदामसोबत खा आणि वजन कमी करा, वाचा याबद्दल अधिक !
वाढलेले वजन
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 4:29 PM
Share

मुंबई : जर आपले वजन वाढत असेल तर ताबडतोब आपल्या आहारावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात करा. एकदा जर वजन वेगाने वाढले तर पुन्हा वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. वजन कमी करणे आणि वाढणे हे सर्व आपल्या आहारावर ठरलेले असते. वजन कमी करण्यासाठी आपण काय आहार घेतो हे सर्वात महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी आहारात डाळिंब आणि बदामसोबत खाल्ल्ये पाहिजे. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. (Eat with pomegranate and almonds and lose weight)

डाळिंबमध्ये व्हिटामिन ए, सी आणि ई भरपूर प्रमाणात आढळतात. यात अँटी-ऑक्सिडंट, अँटी-व्हायरल आणि अँटी-ट्यूमर गुणधर्म देखील आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. बदामामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आहे, म्हणून मूठभर बदाम सेवन केल्यास वजन वाढण्याचा धोकाही वाढत नाही. या व्यतिरिक्त, बदाम आपल्या शरीराची चयापचय टिकवून ठेवतात, जे आपल्या शरीराचे वजन कमी करण्यास आणि नियंत्रित करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. यामुळे आपण डाळिंब आणि बदाम एकत्र खाणीत.

यामुळे आपल्याला बराच काळ भूक लागत नाही आणि आपले वजन कमी होण्यास मदत होते. दररोज आपल्या नाश्त्यामध्ये बदामांचा समावेश करून आपण टाईप 2 मधुमेहाचा धोका टाळू शकता. बदामांमध्ये उच्च फायबर, असंतृप्त चरबी आणि कमी कार्बोहायड्रेट्स असतात. यासह, बदाम कमी ग्लायसेमिक निर्देशांक श्रेणीमध्ये समाविष्ट आहेत, ज्याचा अर्थ असा आहे की त्यामध्ये ग्लूकोजचे प्रमाण बरेच कमी आहे. हेच कारण आहे की, ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास खूप उपयुक्त आहे.

डाळिंबामुळे लठ्ठपणा नियंत्रित होतो, हे बर्‍याच अभ्यासांमध्ये सिद्ध झाले आहे. कारण डाळिंबात फायबर आणि कमी कॅलरीजयुक्त घटक असतात. हे खाल्ल्यानंतर आपल्याला भूक लागत नाही. जर आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर आपल्या आहारात डाळिंबाचा समावेश नक्कीच करा. डाळिंब तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी सुधारण्यास मदत करतो. डाळिंबामध्ये अँटी-ऑक्सिडेंट उपस्थित असल्यामुळे ते फ्री रॅडिकल्सशी लढते. यासह, हे आपल्या शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण देखील कमी करते. डाळिंबामुळे रक्ताच्या गाठी तयार होण्यास प्रतिबंध होतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

सावधान! अपुरी झोप स्त्रियांसाठी घातक, कर्करोगासह ‘या’ गंभीर समस्यांना ठरेल कारणीभूत…

Weather change sickness । बदलत्या हवामानात चुकूनही करु नका या 5 चुका, आजारी पडाल

(Eat with pomegranate and almonds and lose weight)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली