जास्त पेरू खाणे देखील आरोग्यासाठी धोकादायक, वाचा..

पेरू हे फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पेरूमध्ये फायबर आणि पाणी जास्त प्रमाणात असते.

जास्त पेरू खाणे देखील आरोग्यासाठी धोकादायक, वाचा..
पेरू

मुंबई : पेरू हे फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पेरूमध्ये फायबर आणि पाणी जास्त प्रमाणात असते. फक्त पेरुच नाहीतर पेरुच्या बिया देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. ज्यामुळे गॅस, अपचन, पोटाचा त्रास आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकतात. मात्र, कोणतीही गोष्टी प्रमाणाबाहेर खाल्ल्यावर त्याचा त्रास आपल्या शरीराला होतो. काही लोक पेरू आरोग्यासाठी चांगला असल्यामुळे प्रमाणाबाहेर खातात. मात्र, पेरूचे अधिक सेवन केले तर आपण अनेक रोगांना आमंत्रण देतो. (Eating too much guava is also dangerous to health)

-प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे असतात तसे काही तोटे असतात. हो, पेरू खाल्ल्याने गरोदर स्त्रीला काही दुष्परिणाम जाणवू शकतात. पेरूमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे जास्त प्रमाणात पेरू खाल्ल्यास अतिसार होण्याचा धोका असतो. यामुळे गरोदरपणात डिहाइड्रेशनला समोरे जावे लागू शकते. पूर्ण पिकलेला किंवा कच्चा पेरू खाल्ल्याने गरोदरपणात दात दुखी किंवा तत्सम समस्या उद्भवू शकतात.

-जास्त प्रमाणात पेरू सेवन केल्याने लठ्ठपणा देखील वाढू शकतो. पेरूमध्ये साखरेचे भरपूर प्रमाणात असते, जी फ्रुक्टोज म्हणून ओळखली जाते. आपल्या शरीराला फ्रुक्टोज पचायला आणि शोषण्यात त्रास होतो. पोटात सूज आणि गॅस तयार होण्यास सुरवात होते.

-ज्या लोकांना सर्दीचा त्रास होतो त्यांनी शक्यतो पेरू घाणे टाळावे नाहीतर त्यांना सर्दीचा अधिक त्रास होऊ शकतो. पेरूचे जास्त सेवन केले तर तुम्हाला पोटाच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

(टीप : औषध म्हणून वापरण्यासाठी किंवा कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

(Eating too much guava is also dangerous to health)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI