‘या’ शायर्यांनी पावसात व्यक्त करा आपल्या भावना, वाढवा नात्यांची गोडी!
पावसाच्या सरी पडू लागल्या की मनातही भावनांची सरी वाहू लागतात. मात्र अनेकदा या भावना व्यक्त करताना योग्य शब्द सापडत नाहीत. अशावेळी शायरी आपल्या मनातल्या भावना सुंदरपणे व्यक्त करण्याचा प्रभावी मार्ग ठरतो. म्हणूनच या लेखात आम्ही खास तुमच्यासाठी काही निवडक शायर्या दिल्या आहेत ज्या वाचून तुमचे मनही प्रसन्न होईल आणि तुम्ही त्या आपल्या प्रिय व्यक्तींना पाठवून त्यांनाही आनंदित करू शकाल.

सध्या पावसाळ्याने हजेरी लावली असून हवेत गारवा पसरला आहे. सरींच्या ठिपक्यांनी रस्ते चिंब भिजले आहेत आणि मनही ताजेतवाने झाले आहे. हवामानातील हा बदल प्रत्येकाला काही ना काही वेगळी अनुभूती देतो. कोणी गरमागरम चहा आणि भजीचा आस्वाद घेतो, तर कोणी पावसाच्या सरींत भिजण्याचा आनंद लुटतो. याच नाजूक क्षणी काहीजण आपल्या भावना शब्दांत व्यक्त करू पाहतात, मात्र नेहमीच योग्य शब्द सापडत नाहीत. अशावेळी शायरी हा आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचा उत्कृष्ट मार्ग ठरतो.
पावसाच्या रिमझिम सरी जशा मन प्रसन्न करतात, तसंच काही शब्दही मनाला हलके करतात. आपल्या प्रिय व्यक्तीला, मित्रांना किंवा कुणालाही खास भावना व्यक्त करायच्या असतील, तर पावसाच्या या सुंदर शायर्या अतिशय उपयुक्त ठरतात. आज आम्ही तुमच्यासाठी खास हिंदी आणि मराठी शायर्यांचा संग्रह घेऊन आलो आहोत, ज्या तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीला पावसात नक्की पाठवू शकता.
या आहेत खास हिंदी शायरी
धूप सा रंग है और खुद है वो छाँवो जैसा उसकी पायल में बरसात का मौसम छनके
– क़तील शिफ़ाई
धूप ने गुज़ारिश की एक बूँद बारिश की
– मोहम्मद अल्वी
दूर तक छाए थे बादल और कहीं साया न था इस तरह बरसात का मौसम कभी आया न था
– क़तील शिफ़ाई
बरसात का बादल तो दीवाना है क्या जाने किस राह से बचना है किस छत को भिगोना है
– निदा फ़ाज़ली
साथ बारिश में लिए फिरते हो उस को ‘अंजुम’ तुम ने इस शहर में क्या आग लगानी है कोई
– अंजुम सलीमी
याद आई वो पहली बारिश जब तुझे एक नज़र देखा था
– नासिर काज़मी
ओस से प्यास कहाँ बुझती है मूसला-धार बरस मेरी जान
– राजेन्द्र मनचंदा बानी
भीगी मिट्टी की महक प्यास बढ़ा देती है दर्द बरसात की बूँदों में बसा करता है
– मरग़ूब अली
गुनगुनाती हुई आती हैं फ़लक से बूँदें कोई बदली तिरी पाज़ेब से टकराई है
– क़तील शिफ़ाई
घटा देख कर ख़ुश हुईं लड़कियाँ छतों पर खिले फूल बरसात के
– मुनीर नियाज़ी
कोई कमरे में आग तापता हो कोई बारिश में भीगता रह जाए
– तहज़ीब हाफ़ी
आने वाली बरखा देखें क्या दिखलाए आँखों को ये बरखा बरसाते दिन तो बिन प्रीतम बे-कार गए
– हबीब जालिब
खास मराठी शायरी फक्त तुमच्यासाठी
तुला सोबत घेऊन पावसात फिरावंसं वाटतं, त्या प्रत्येक थेंबात आपल्या प्रेमाचं गाणं ऐकावंसं वाटतं.
पावसात तुझा हात धरून फिरण्याची मजा, जगातल्या कोणत्याही आनंदापेक्षा वेगळी आहे.
तुला पावसात मी कधीच नाही का आठवत? मला तर पाऊस फक्त निमित्त आहे, कारण तुझी आठवण माझी पाठ कधीच नाही सोडत…
तुम्ही देखील या पावसात आपल्या खास व्यक्तीला ही शायरी पाठवून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या सरी पाडा!
