AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Goa Beaches | निळेशार पाणी, पांढरी-सोनेरी वाळू, ‘हे’ आहेत  गोव्यातील सर्वात सुंदर समुद्र किनारे!

गोवा हे राज्य समुद्रकिनारे आणि या किनाऱ्यांवर उधळणाऱ्या लाटा पाहण्याकरता केवळ भारतातीलच नव्हे, तर परदेशातील पर्यटकांचेही आवडते ठिकाण बनले आहे.

Goa Beaches | निळेशार पाणी, पांढरी-सोनेरी वाळू, ‘हे’ आहेत  गोव्यातील सर्वात सुंदर समुद्र किनारे!
| Updated on: Dec 30, 2020 | 6:22 PM
Share

मुंबई : गोवा हे राज्य समुद्रकिनारे आणि या किनाऱ्यांवर उधळणाऱ्या लाटा पाहण्याकरता केवळ भारतातीलच नव्हे, तर परदेशातील पर्यटकांचेही आवडते ठिकाण बनले आहे. जगातील आकर्षक किनाऱ्यांमुळे गोवा हे देशातील सर्वात लोकप्रिय पर्यटन ठिकाण ठरले आहे. गोव्यात येणाऱ्या प्रत्येकाची आवड वेगवेगळी असली,  तरी सर्वांनाच समुद्रकिनाऱ्यावरील वाळू आणि पाण्यात मनसोक्त डुंबण्याचा आनंद घ्यायला आवडतो. अशातच समुद्र किनारे आणि समुद्राचे पाणी स्वच्छ असेल तर, या मौजमजेचा आनंद द्विगुणीत होतो. गोव्यातील प्रत्येक समुद्र किनाऱ्यावर कमालीची स्वच्छता पाहायला मिळते. तेव्हा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आणि सुट्टीत धमाल करण्यासाठी गोव्यातील ‘या’ 5 समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट दिली पाहिजे (Famous beautiful beaches in Goa).

मोरजिम बीच

पणजीच्या उत्तरेस स्थित ‘मोरजिम बीच’ हा समुद्रकिनारा पर्यटकांमध्ये लोकप्रिय होत आहे. मोरजिम समुद्र किनारा पक्षी निरीक्षण आणि ऑलिव्ह रिडले कासावांमुळे प्रसिद्ध झाला आहे. गोव्यातील मोरजिम बीचच्या स्वच्छ समुद्री वाळूवर धमाल करू शकता. समुद्रकिनार्‍यावरील शॅक आणि बांबूच्या झोपड्या या पर्यटनस्थळाला आणखी आकर्षक बनवतात.

बागा बीच

मोरजिम बीचच्या थोड्या पुढे असलेला बागा बीच एक पूर्णपणे भिन्न वातावरणाचा आनंद देतो. हा समुद्र किनारा गोव्यातील सर्वात प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. येथे आपल्याला अतिशय शांत वातावरण आणि मनमोहक वातावरण पहायला मिळेल. कॉफी आणि निसर्गाचा आनंद घेण्याबरोबरच येथे आपण जेट स्की, स्पीड बोट, बनाना राईड या वॉटरस्पोर्टचा आनंद देखील घेऊ शकता (Famous beautiful beaches in Goa).

वॅगेटर बीच

वॅगेटर बीच पणजीपासून 22 किमी अंतरावर स्थित आहे. हे गोव्याच्या इतर किनाऱ्यांपेक्षा कमी गर्दीचे ठिकाण आहे. पांढरी वाळू, कातळ खडक, नारळ आणि खजुराची झाडे या समुद्र किनाऱ्याची शोभा वाढवतात. वॅगेटरचा हा पांढरा वालुकामय समुद्रकिनारा ‘बिग वॅगेटर ‘ आणि ‘लिटल वॅगेटर ‘ या नावानेही ओळखला जातो.

मीरामार बीच

पणजीपासून केवळ 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या या सुंदर समुद्रकिनाऱ्यावरील कोमल वाळू, ताडाची झाडे आणि अरबी समुद्राच्या निळ्याशार पाण्याने इथे येणारे सगळे पर्यटक मंत्रमुग्ध होतात. या सौंदर्यामुळेच त्याला ‘गोल्डन बीच’ म्हणून देखील ओळखले जाते.

मोबोर बीच

मोबोर बीच हा साहसीक्रीडाप्रेमी पर्यटकांसाठी उत्तम स्थान आहे. हा गोव्यातील सर्वात प्रसिद्ध समुद्र किनारा आहे. वॉटर स्कीइंग, वॉटर सर्फिंग, जेट स्की, बनाना राइड्स आणि पॅरासेलिंग यासारख्या अनेक साहसी खेळांचा आनंद या समुद्र किनाऱ्यावर घेता येतो. वर्षाच्या कुठल्याही महिन्यात येथे भेट देऊ शकता. तरीही सप्टेंबर ते मार्च हा पर्यटनाचा सर्वोत्तम कालावधी आहे.

(Famous beautiful beaches in Goa)

हेही वाचा :

राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी.
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग.
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात.
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.