श्रीनगरला फिरायला जाताय, ‘ही’ ठिकाणं नक्की पाहा

येत्या काही दिवसात तुम्हीही श्रीनगरला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर तुम्ही या ठिकाणांना नक्की भेट द्या. (Famous tourist destinations in Jammu Kashmir Srinagar)

श्रीनगरला फिरायला जाताय, 'ही' ठिकाणं नक्की पाहा
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 10:14 PM

मुंबई : हिवाळ्याच्या ऋतू प्रवास करण्याची मज्जा काही वेगळीच असते. सध्या अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडली आहे. या थंडीत तुम्हीही श्रीनगरला फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर ती तुमच्यासाठी फारच सुंदर ठिकाण ठरेल. काश्मीरच्या मध्यभागी असलेले श्रीनगर ही फारच लोकप्रिय जागा आहे.  श्रीनगरमधील नगीन आणि दाल ही दोन्ही सरोवर जगप्रसिद्ध आहे. अनेकजण या तलावांची सफर करण्यासाठी फक्त श्रीनगरला भेट देतात. जर तुम्हाला नैसर्गिक सौंदर्य पाहण्यात रस असेल, तर तुम्ही एकदा तरी श्रीनगरला नक्की भेट द्यावी. (Famous tourist destinations in Jammu Kashmir Srinagar)

वर्षभरातील कोणत्याही महिन्यात तुम्ही श्रीनगरला जाऊ शकता. श्रीनगर हे हाऊसबोट आणि तलाव यासाठी प्रसिद्घ असलेले शहर आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी अनेक प्रसिद्घ ऐतिहासिक मंदिर आहे. यासोबतच नैसर्गिक सौंदर्य, शांत वातावरण आणि तलावात विहार करणाऱ्या सुंदर हाऊस बोट याचा अनुभव घेण्यासाठी जगभरातून या ठिकाणी लोकं येतात. जर येत्या काही दिवसात तुम्हीही श्रीनगरला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर तुम्ही या ठिकाणांना नक्की भेट द्या.

श्रीनगरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळं

दाल सरोवर

दाल सरोवराला श्रीनगरचे दागिना समजला जातो. या ठिकाणी असणाऱ्या सर्वात प्रसिद्ध स्थळांमध्ये या सरोवराचे नाव असतं. हे सरोवर सकाळपासून संध्याकाळपर्यंत पर्यटकांसाठी खुलं असते. या ठिकाणी असणाऱ्या हाऊसबोट पर्यटकांचे खास आकर्षण आहे. दरवर्षी हजारो पर्यटक या हाऊसबोटचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येतात.

मुघल गार्डन

मुघल गार्डन या नावातूनच समजतं की हे गार्डन मुघलांच्या काळात तयार करण्यात आले आहे. यात निशात बाग, शालीमार गार्डन आणि चश्में-ए-शाही अशी तीन ठिकाण आहेत. या व्यतिरिक्त या ठिकाणी अनेक कारंजे लावण्यात आले आहेत. ज्यामुळे तुम्ही याकडे आपोआपचं आकर्षित होता.

निशात बाग

निशात बाग ही दाल सरोवराच्या किनाऱ्यालगत आहे. याची निर्मिती 1633 मध्ये अब्दुल हसन आसफ खान यांनी केले होते. या बागेत अनेक दुर्मिळ फुले पाहायला मिळत होती. त्यामुळे या बागेला आनंदाचा बाग असे म्हटले जाते. (Famous tourist destinations in Jammu Kashmir Srinagar)

संबंधित बातम्या : 

तुम्ही जीममध्ये जाता? या गोष्टी ध्यानात ठेवाच…

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.