AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरी पैठणी साडी कशी ओळखायची? वाचा,

पैठणीच्या विणण्यावरून तिचे प्रकार पडले आहेत. एक प्रकार म्हणजे हातमागावर विणण्यात आलेली पैठणी (Handmade Paithani) आणि दुसरा म्हणजे मशिनवर बनवलेली पैठणी (Machine-made Paithani). हाताने बनवलेली पैठणी ही ओरिजनल असते तर मशिनवर बनलेली पैठणी तुलनेत कमी असते.

खरी पैठणी साडी कशी ओळखायची? वाचा,
पैठणी साडी
| Edited By: | Updated on: Aug 07, 2021 | 8:50 AM
Share

पैठणी (Paithani Sari) आवडत नाही अशी एकही महिला निदान महाराष्ट्रात तरी सापडणार नाही. भरजरी पैठणी नेसून स्वतःला आरशात पाहावं असं प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं. आपली आवडती पैठणी घेण्यासाठी महिला कितीही पैसे मोजयला तयार असतात.

बदलल्या काळाप्रमाणे पैठणीच्या ट्रेन्डमध्येही बदल होत आहेत. डिझायनर साड्यांप्रमाणे (Designer Sari) पैठणीतही वेगवेगळ्या डिझाइन्सचा ट्रेन्ड आलाय. हातमागावरची पैठणी मशिनवर तयार होऊ लागली आहे. अशात अनेक फसवणुकीचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे तुम्हाला खरी म्हणजेच हातमागावरची पैठणी आणि मशिनमेड पैठणी यातला फरक समजणं आवश्यक आहे. राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त (National Handloom Day) जाणून घेऊयात, खरी पैठणी कशी ओळखायची.  (How to recognize a real paithani sari?)

पैठणीचे दोन प्रकार

पैठणीच्या विणण्यावरून तिचे प्रकार पडले आहेत. एक प्रकार म्हणजे हातमागावर विणण्यात आलेली पैठणी (Handmade Paithani) आणि दुसरा म्हणजे मशिनवर बनवलेली पैठणी (Machine-made Paithani). हाताने बनवलेली पैठणी ही ओरिजनल असते तर मशिनवर बनलेली पैठणी तुलनेत कमी असते.

कशी ओळखाल हाताने बनवलेली पैठणी?

खरी पैठणी ओळखणं तसं कसब आहे. मात्र, काही टिप्स लक्षात ठेवल्या तर तुम्हाला पैठणीची पारख करणं सोपं जाईल. हातमागावर तयार केलेल्या पैठणीचे धागे पदराच्या दोन्ही बाजूंनी सारखेच दिसतात. यात धागा कुठेच कापला जात नाही. दोन्ही बाजूंनी पैठणीवरची डिझाईन सारखीच असते. त्याच्या धाग्यांमध्येही समानता असते. साडीची बॉर्डर आणि पदरही सारखा असतो. यासोबतच खऱ्या पैठणीचं वैशिष्ठ्य म्हणजे पैठणीची जर कधीच काळी पडत नाही.

याऊलट मशिनमध्ये बनवलेल्या पैठणीचे धागे दोन्ही बाजूंनी वेगळे असतात. मशिनमध्ये बनवल्यामुळे पदराच्या मागच्या बाजूने धागे खुले झालेले असतात.

का महाग असते पैठणी?

खरी पैठणीही हातमाग यंत्रावरच तयार होते. त्यासाठी राज्यातली अनेक शहरं प्रसिद्ध आहेत. एक पैठणी तयार करण्यासाठी एका कारागिराला एक महिना लागू शकतो. हातमागावर तयार करण्यात आलेल्या पैठणीत शुद्ध जर आणि रेशमाचा वापर केला जातो. अशाप्रकारे तयार झालेली पैठणी ही 3 ते 4 पिढ्यांपर्यंत वापरली जाऊ शकते. म्हणूनच खऱ्या पैठणी साड्यांच्या किंमती आता वाढत आहेत. शुद्ध जर आणि रेशीम वापरून तयार केलेल्या पैठणी साड्यांची किंमत 10 ते 25 हजारांपासून सुरू होते. ही किंमत पैठणीच्या डिझाईन आणि साहित्यानुसार 2 लाखांपर्यंतही जाऊ शकते.

फसवणूकीचं प्रमाण वाढलं

पैठणी साडीच्या किंमती वाढत जात असताना स्वस्त पैठणीचं अमिष दाखवून फसवणुकीचे प्रमाणही वाढत आहे. सेमी पैठणी, किंवा बनावट पैठणी खरी पैठणी म्हणून विकल्या जात आहेत. विशेषतः सणासुदीच्या दिवसात, दिवाळीत आणि लग्नसराईत अशाप्रकारे बनवाट पैठण्या विक्रीचा बाजार गरम असतो. त्यामुळे फसवणूक होऊ द्यायची नसेल तर तुम्हाला खरी पैठणी ओळखता येणं गरजेचं आहे.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.