AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्लॅक कॉफी आणि लिंबाचा रस हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानकारक, जाणून घ्या…

चहा आणि कॉफी हे प्रत्येक भारतीयांचे आवडते पेयं आहेत.आजकाल अनेकजण ब्लॅक कॉफी पिऊन आपल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का ब्लॅक कॉफीमध्ये लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्याने नेमके काय फायदे होतात? चला याबद्दल जाणून घेऊयात.

ब्लॅक कॉफी आणि लिंबाचा रस हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानकारक, जाणून घ्या...
black coffee and lemon juiceImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 26, 2026 | 4:25 PM
Share

आजकाल कॉफी पिण्याच्या पद्धतीतही अनेक बदल झाले आहेत. यामध्ये ब्लॅक कॉफी विशेषतः लोकप्रिय आहे. शरीरात ऊर्जा वाढवण्यासोबतच वजन नियंत्रणासाठीही ब्लॅक कॉफीचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. पण तज्ञ सांगतात की,आजकाल ब्लॅक कॉफीत लिंबाचा रस मिक्स करून पिण्याचा ट्रेंड सध्या अधिक चर्चेत आहे. पण अनेक लोकं याला वजन कमी करण्याचा आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचा एक सोपा मार्ग मानतात, परंतु केवळ या एका पेयामुळे लक्षणीय बदल होण्याची शक्यता कमी आहे.

ब्लॅक कॉफीमध्ये असलेल्या कॅफीनमुळे शरीराचा ऊर्जा वापर आणि चयापचय दर काही काळासाठी वाढू शकतो. तसेच काही व्यक्तींमध्ये कॅफीनमुळे भूक थोडी कमी होऊ शकते. मात्र हे परिणाम मर्यादित आणि तात्पुरते असतात. त्यामुळे दीर्घकाळ वजन कमी करण्यासाठी केवळ ब्लॅक कॉफी किंवा लिंबू कॉफीवर अवलंबून राहण्याऐवजी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य जीवनशैली अधिक महत्त्वाची ठरते.

ब्लॅक कॉफी आणि लिंबाच्या रसाचा कॉम्बो

तज्ज्ञांच्या मते, ब्लॅक कॉफीमधील कॅफीनमुळे ऊर्जा आणि ताजेतवानेपणा जाणवू शकतो, तर लिंबू हे व्हिटॅमिन C चे चांगले स्रोत आहे. मात्र, कॉफीमध्ये लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्याने व्हिटॅमिन C मुळे शरीरातील फॅट लक्षणीय प्रमाणात कमी होते, असे ठोस पुरावे नाहीत.

त्यामुळे ब्लॅक कॉफी आणि लिंबाचा रस एकत्र घेतल्याने वजन झपाट्याने कमी होते असा दावा करणे योग्य ठरणार नाही. या दोन्हींचे मिश्रण आरोग्यासाठी विशेष फायदेशीर ठरते, याबाबतही सध्या पुरेसा ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.

या समस्या उद्भवू शकतात

तज्ञ डॉक्टर असेही म्हणाले की, याकडे डिटॉक्स पेय म्हणून पाहण्याची गरज नाही. आपले यकृत आणि मूत्रपिंड नैसर्गिकरित्या विषारी पदार्थ बाहेर टाकतात. ब्लॅक कॉफी आणि लिंबाचे हे मिश्रण प्रत्येकासाठी फायदेशीर नसते. ज्यांना ॲसिडिटी, गॅस, छातीत जळजळ किंवा ॲसिड रिफ्लक्सचा त्रास आहे, त्यांनी याचा वापर सावधगिरीने करावा, कारण त्यामुळे त्यांची समस्या आणखी बिघडू शकते.

कॉफीचे पिण्याचे शरीराला होणारे इतर नुकसान

कॉफीमधील कॅफीनच्या प्रमाणाचा विचार करणेही महत्त्वाचे आहे. जास्त प्रमाणात कॅफीनचे सेवन केल्यास झोपेत व्यत्यय, अस्वस्थता, हृदयाची गती वाढणे किंवा पोटाचे विकार होऊ शकतात. जर तुम्हाला त्याची चव आवडत असेल, तर तुम्ही कॉफी योग्य प्रमाणात पिऊ शकता, परंतु वजन कमी करण्यासाठी किंवा शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी केवळ त्यावर अवलंबून राहणे योग्य नाही.

वजन नियंत्रणासाठी कॅलरी सेवन, प्रथिने आणि फायबर, शारीरिक हालचाल आणि चांगली झोप अधिक महत्त्वाची भूमिका बजावतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात