AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिमला जायला वेळ नाही? बेली फॅट कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या गोष्टी

बऱ्याच लोकांना बेली फॅट कमी करणे हे अवघड वाटते. तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची आहे पण जिमला जाण्यासाठी वेळ नसेल तर आता अजिबात काळजी करू नका. तुम्ही या काही सोप्या गोष्टी फॉलो करून तुमच्या पोटाची चरबी कमी करू शकता.

जिमला जायला वेळ नाही? बेली फॅट कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या गोष्टी
belly fat
| Updated on: Sep 22, 2026 | 3:23 PM
Share

पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात. ज्यात मुख्यत्वे जिमला जाण्याचा सल्ला दिला जातो. पण अनेक वेळा व्यायाम करणे, वॉकला जाणे, जिम करणे शक्य होत नाही. तुम्हाला सुद्धा तुमच्या व्यस्त वेळापत्रकामुळे जिमला जाण्यासाठी वेळ मिळत नसेल तर काळजी करू नका. तुम्ही जिमला न जाता सुद्धा काही गोष्टी फॉलो करून हट्टी बेली फॅट कमी करू शकता. पोटाची चरबी कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टी फॉलो कराव्या, जाणून घ्या

बेली फॅट कमी करण्यासाठी साखरचे सेवन पूर्णपणे बंद करा. साखर असलेले पेय घेण्याऐवजी शुगर फ्री चहा किंवा ब्लॅक कॉफी फायद्याचे ठरू शकते. पॅकेट फूड घेताना त्यातील अडेड शुगर तपासूनच पदार्थाचे सेवन करा. शुगर क्रेव्हिंग कमी करण्यासाठी फळे खा. आहारातून साखर बाहेर काढल्याने फॅट कमी होण्यास मदत होऊ शकते.

प्रोटीन आणि फायबर खा

पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रोटीन आणि फायबर असलेले डाएट महत्त्वपूर्ण म्हटले जाते. या दोन्ही पोषक घटकांमुळे पोट बराच वेळ भरलेले असल्याचे जाणवते. शिवाय हे पचनास देखील मदत करतात. यामुळे वजन कमी करताना मसल लॉस होत नाही आणि अनहेल्दी खाण्याची क्रेव्हिंग सुद्धा होत नाही. त्यामुळे बेली फॅट कमी करण्यासाठी आपल्या आहारात योग्य प्रमाणात प्रोटीन आणि फायबरचा समावेश करा.

भरपूर पाणी प्या

केवळ हायड्रेशनसाठी नाही तर बेली फॅट कमी करण्यासाठी देखील भरपूर पाणी पिणे खूप आवश्यक आहे. यामुळे शरीराची चरबी तर कमी होतेच शिवाय पोटाचे आरोग्य देखील चांगले राहते. रोज कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे.

नीट झोप घ्या

स्ट्रेसमुळे आपल्या पोटाची चरबी वाढू शकते. झोप पूर्ण झाली नाही तर कार्टिसोल हार्मोन ट्रिगर होऊ शकते, ज्यामुळे वेट लॉस करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे झोप पूर्ण होईल याची काळजी घ्या.

Follow Us
युपीआय शुल्कावरून पेट्रोल पंप चालक संतप्त, बंदचा इशारा
Video : युपीआय शुल्कावरून पेट्रोल पंप चालक संतप्त, बंदचा इशारा
विशाखा राऊतांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! रिक्त जागेवर...
Vishakha Raut : विशाखा राऊतांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! रिक्त जागेवर...; कोर्टने नेमके काय दिले आदेश?
सोलापुरात पावसाचा येलो अलर्ट: शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, पण...
Video : सोलापुरात पावसाचा येलो अलर्ट: शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित, पण दुष्काळाची चिंता कायम
दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, बड्या नेत्यावर दिली..
दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, बड्या नेत्यावर दिली जबाबदारी
शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बोलेरो गाड्या... कारण काय?
शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बोलेरो गाड्या... नेमकं कारण काय?
कर्नाटकात दुष्काळ जाहीर महाराष्ट्रात कधी? आजच्या कॅबिनेट बैठकीवर लक्ष
Maharashtra Farmer Issue : कर्नाटकात दुष्काळ जाहीर महाराष्ट्रात कधी? आजच्या कॅबिनेट बैठकीवर राज्याचं लक्ष
राहुल बोंद्रेंच्या पक्षांतराबाबतच्या भूमिकांवर श्वेता महालेंची टीका
राहुल बोंद्रेंच्या पक्षांतराबाबत बदलत्या भूमिकांवर श्वेता महाले कडाडल्या; म्हणाल्या...
आम्ही मध्यस्थी केली अन् 13 मागण्या पूर्ण झाल्या; मराठा आरक्षणावर...
Maratha Andolan : आम्ही मध्यस्थी केली अन् 13 मागण्या पूर्ण झाल्या; मराठा आरक्षणावर प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले?
शेतकरी संतप्त, अधिकारी गैरहजर; बाळासाहेब थोरातांनी आंदोलनात उतरून...
शेतकरी संतप्त, अधिकारी गैरहजर; बाळासाहेब थोरातांनी आंदोलनात उतरून सरकारला सुनावलं
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावे शोधणार; जरांगे पाटलांची अभ्यासकांना
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावे शोधणार; जरांगे पाटलांची अभ्यासकांना मोठी हाक