Hair care : कोरड्या निर्जीव केसांपासून मुक्त होण्यासाठी नक्की ट्राय करा ‘हे’ हायड्रेटिंग सीरम

उन्हाळ्याच्या हंगामात आपले केस कोरडे आणि निर्जीव दिसतात. अशा परिस्थितीत आपण केसांना मॉइश्चराइझ ठेवण्यासाठी सीरम शॅम्पू वापरू शकतो.

Hair care : कोरड्या निर्जीव केसांपासून मुक्त होण्यासाठी नक्की ट्राय करा 'हे' हायड्रेटिंग सीरम
मुलतानी माती हे केसांसाठी एक उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर मानले जाते. हा पॅक बनवण्यासाठी दोन चमचे मुलतानी माती पावडर घ्या आणि त्यात थोडेसे पाणी घालून जाड पेस्ट बनवा. आता हा पॅक आपल्या केसांमध्ये लावा आणि त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा.

मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामात आपले केस कोरडे आणि निर्जीव दिसतात. अशा परिस्थितीत आपण केसांना मॉइश्चराइझ ठेवण्यासाठी सीरम शॅम्पू वापरू शकतो. केस मऊ ठेवण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस केसांना तेलाने मालिश करा. केसांना सीरम लावल्याने सूर्याच्या प्रकाशापासून केसांचे संरक्षण होते. हेअर सीरम लावल्याने आपले केस चमकदार आणि निरोगी बनतात. (Follow these tips to prepare hydrating serum at home)

साहित्य

1. बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी -7 आणि अँटीऑक्सिडंट् असते. ते वापरल्याने आपले केस निरोगी, हायड्रेटेड आणि मजबूत राहतात.

2. द्राक्षाच्या तेलात व्हिटॅमिन ई मुबलक असते, जे केस कोमल ठेवण्यास मदत करते. कोंडा कमी करण्यासही मदत करते.

3. रोजमेरी एसेन्शियल तेलामध्ये अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे केस मजबूत होतात. या तेलामुळे केस पांढरे होणे देखील थांबतात.
तयार करण्याची पध्दत

तयार करण्याची पध्दत : 

1. एका वाटीत दोन चमचे बदाम तेल आणि दोन चमचे द्राक्ष तेल घाला.

2. नंतर रोजमेरी एसेन्शियल तेलाचे पाच थेंब घाला आणि तिन्ही गोष्टी एकत्र मिसळा.

3. यानंतर ते एका बाटलीमध्ये ठेवा.

4. केसांना मॉइश्चराइझ ठेवण्यासाठी हे हेअर सीरम वापरा.

साहित्य

1. अ‍वोकाडो तेलामध्ये फॅटी अॅसिडस् आणि अमीनो अॅसिड असते. ज्यामुळे आपले केस मऊ होतात. तसेच केस पांढरे होण्यापासून प्रतिबंधित करते. हे आपल्या केसांना सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करण्यास मदत करते.

2. व्हिटॅमिन ई कॅप्सूल केस गळतीस प्रतिबंध करते. हे रक्ताभिसरण वाढवते जे केस चमकदार ठेवण्यास मदत करते.

3. गुलाबाच्या पाण्यात प्रतिजैविक गुणधर्म असतात. ज्यामुळे केस मऊ आणि सरळ होण्यास मदत होते.

तयार करण्याची पध्दत : 

1. हे केस सीरम तयार करण्यासाठी, एका वाटीत 2 चमचे अ‍वोकाडो तेल आणि एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळा.

2. या मिश्रणात एक कप गुलाब पाणी घाला आणि बाटलीत ठेवा.

(टीप : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित असून, डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Follow these tips to prepare hydrating serum at home)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI